परभणी : पालम ते लोहा राष्ट्रीय महामार्गावर आईन वाडी फाट्यानजीक जीप-दुचाकी अपघातात एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. ही घटना आज सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. गोपाळ पुंडलिक शिंदे (५० ) असे मृताचे नाव असून त्यांचा मुलगा भागवत (१८ )हा गंभीर जखमी आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोहा येथून काम आटोपून गोपाळ पुंडलिक शिंदे मुलगा भागवत सोबत पालम कडे दुचाकीवर ( एमएच २२ ए एस १३२९) जात होते. याच दरम्यान, पालमहून लोहाकडे येणाऱ्या जीपसोबत ( एमएच22 ए एम २१६१) धडक झाली. यात दुचाकीवरील बापलेक रस्त्याच्या कडेला फेकली गेली. गोपाळ शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा भागवत गंभीर जखमी असून त्याच्यावर नांदेड उपचार सुरु आहेत.