परभणी कृषी विज्ञान केंद्र व उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पाच्या वतीने जिल्ह्यात ५३ गावांमध्ये उत्तम कापूस निर्मिती प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत २५ ऑगस्टला जीवन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव रविराज देशमुख यांच्या हस्ते कोरोना काळात मृत झालेल्या ३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपये तसेच १३ शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांचा धनादेश व २ हजार ५०० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू अशी प्रत्येकी ५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. प्रशांत भोसले, कॉटन कनेक्ट प्रकल्पाचे संचालक हेमंतकुमार ठाकरे यांची उपस्थिती होती. दरम्यान उत्तम कापूस निर्मिती प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी प्रकल्प व्यवस्थापक जयदीप शेटे, श्रीधर पवार, शरद ठमके, सोमेश्वर सूर्यवंशी, कामाजी भिसे, मनीषा गिरी, आदी प्रयत्न करत आहेत.
१६ शेतकऱ्यांना ‘जीवनज्योत’ची आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 4:22 AM