लोकमत न्यूज नेटवर्कबोरी (परभणी) : परभणी ते जिंतूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्ता तयार करण्यासाठी खोदकाम करण्यात आले असून मागील १५ दिवसांपासून हे काम ठप्प पडल्याने प्रवाशांच्या गैरसोयीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.ऋतिक कन्स्ट्रक्शन कंपनीच्या वतीने जिल्ह्यातील प्रमुख मार्गाचे काम सुरु आहे. मात्र हे काम संथगतीने होत असल्याने प्रवाशांच्या अडचणीत भर पडली आहे. रस्ता प्राधिकरण विभागामार्फत रस्त्याचे काम केले जात आहे. परभणी ते जिंतूर या मार्गावरुन औरंगाबाद, हैदराबादकडे जाणारी वाहतूक आहे. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.वर्षभरापूर्वी हा रस्ता एका बाजुने खोदून ठेवला आहे. त्यामुळे या संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणावर धूळ वाढली असून पिकांनाही धोका निर्माण झाला आहे.वर्षभरापासून आतापर्यंत २० टक्केही काम पूर्ण झाले नाही. रस्त्याचे खोदकाम केल्याने किरकोळ अपघातांची संख्या वाढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून रखडलेले काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश देण्याची मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे.परभणी- जिंतूर राष्ट्रीय महामार्गासाठी रस्ता खोदून ठेवल्याने प्रवाशांसह या रस्त्यावरील अनेक गावांमधील ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी लक्ष देऊन तात्काळ काम सुरु करावे, अशी मागणी उपसरपंच शेख रफीक अब्दुल हक यांनी केली आहे.
जिंतूर- परभणी राष्ट्रीय महामार्गाचे काम ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 1:09 AM