परभणी : येथील आयसर संस्थेच्या वतीने २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त होमीभाभा परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या बालवैज्ञानिकांची प्रश्नमंजूषा घेण्यात आली. त्यात रुद्र कंधारकर, ओमकार बुलबले यांच्या चमूने प्रथम क्रमांक मिळविला.
येथील शास्रीनगर भागात आयसरच्या वतीने रविवारी राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कोरोनाच्या संसर्गामुळे केवळ होमीभाभा परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. जगातील विज्ञानाचे प्रकल्प आणि शास्रज्ञांच्या माहितीवर आधारित या प्रश्नमंजूषेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.रामेश्वर नाईक, आयसरचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.सुनील मोडक, सुधीर सोनूनकर, प्रसन्न भावसार, कैलास सुरवसे, महेश शेवाळकर, दीपक शिंदे, संध्या गावंडे, डॉ.अनुराग मोडक, डॉ.सुभाष शिसोदिया, डॉ.संदीप वानखेडे यांची उपस्थिती होती. रोहन घोरवाडे यांनी गुणलेखक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमात कमी वयात पेटंट मिळविणाऱ्या ऊर्जित प्रसन्न भावसार याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश पंडित, विकास किलमिशे आदींनी प्रयत्न केले.
विजेत्यांना पारितोषिक वितरण
या प्रश्नमंजूषा स्पर्धेत रुद्र कंधारकर, ओमकार बुलबुले, गौरव मार्डीकर, मधुरा दांडे यांच्या गटाने प्रथम क्रमांक मिळविला. विराज किलमिसे, कृतिका लोया, ऊर्जित भावसार, जयदीप चव्हाण यांच्या गटाने द्वितीय क्रमांक, तर सानवी वैद्य, प्रिया पंडित, निकुंज सोनी, आदिश बुर्से यांच्या गटाने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले.