लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : आज देशातील उत्पादन वाढीच्या दृष्टीने मृदा व जलसंधारण, कृषी यांत्रिकीकरण, हवामान बदलास अनुकूल कृषी तंत्रज्ञान आदी बाबींचा विचार करावा लागेल. कृषी यांंत्रिकीकरणासाठी युवा शेतकºयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे उपमहानिदेशक डॉ.नरेंद्रसिंह राठोड यांनी केले.येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने १८ मे रोजी आयोजित खरीप शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी डॉ.राठोड बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरु डॉ.बी.व्यंकटेस्वरलू हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार शिक्षण संचालक डॉ.पी.जी. इंगोले, शिक्षण संचालक डॉ. व्ही.डी.पाटील, संशोधन संचालक डॉ.डी.पी.वासकर, डॉ.पी.आर. शिवपुजे, के.आर.सराफ, डॉ.पी.आर. देशमुख यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ. राठोड म्हणाले, देशातील ६९० विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकºयांपर्यंत कृषी तंत्रज्ञान प्रसारासाठी प्रयत्न चालू आहेत.बदलत्या हवामानातील शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. त्याच बरोबर शेतकरी हा समाजातील सन्माननीय व्यक्ती असून शेतकरी वाचला तर देश वाचेल. शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर निश्चित असे धोरण ठरविण्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणाले.या मेळाव्यात डॉ.पी.आर.झंवर यांनी गुलाबी बोंडअळी, डॉ. ए.जी. पंडागळे यांनी कापूस लागवड, डॉ.यु.एन.आळसे यांनी सोयाबीन, डॉ.आसेवार यांनी कोरडवाहू शेतीबद्दल मार्गदर्शन केले. त्यानंतर शेतीभाती खरीप विशेषांक, विद्यापीठ शास्त्रज्ञ लिखित विविध विषयांवरील पुस्तिका, घडी पत्रिका आदींचे विमोचन करण्यात आले.प्रदर्शनात ७० स्टॉल्सपरभणी येथील विद्यापीठात दरवर्षी होणाºया खरीप मेळाव्यास मोठे महत्त्व आहे. जिल्ह्यासह पर जिल्ह्यातील शेतकरी आवर्जून या मेळाव्यात येतात. या मेळाव्यातील आगामी खरीप हंगामातील पिकांच्या लागवड, संवर्धनाचे शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येते. त्याच बरोबर आलेल्या शेतकºयांना दर्जेदार बियाणे उपलब्ध व्हावे व कृषी संबंधित यांत्रिकीकरणाची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी, या हेतुने स्टॉल्सची उभारणी करण्यात येते. शुक्रवारी झालेल्या मेळाव्यामध्ये ७० स्टॉल्सची उभारणी करण्यात आली होती.या शेतकºयांचा सन्मानखरीप मेळाव्यामध्ये शासन पुरस्कारप्राप्त प्रगतशील शेतकºयांचा सत्कार करण्यात आला. त्यात बीड जिल्ह्यातील विद्या रुद्राक्ष, व्यंकटी गिते (परळी), लातूर जिल्ह्यातील शिवाजी कन्हेरे, दिलीप कुलकर्णी (उदगीर), औरंगाबाद जिल्ह्यातील शिवाजी बनकर, दत्तात्रय फटांगरे (नांदर ता.पैठण), बाळासाहेब जिवरख (धोंदलगाव ता. वैजापूर), उस्मानाबाद जिल्ह्यातील मारोती डुकरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सिल्लोड तालुक्यातील पानवडोद येथील दिवंगत प्रगतशील शेतकरी राजेश चोबे यांच्या वतीने त्यांचे बंधू सचिन चोबे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात खरीप मेळावा: कृषी यांत्रिकीकरणासाठी युवा शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा -नरेंद्रसिंह राठोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:21 AM