दुभाजकांमधील झाडे सुकू लागली
देवगाव फाटा: सेलू शहरात सुशोभीकरणासाठी रायगड ते रेल्वेस्थानक या मुख्य रस्त्यावरील दुभाजकामध्ये लावलेली झाडे यावर्षी पावसाच्या पाण्याने चांगलीच बहरली होती.परंतू गेल्या पंधरा दिवसापासून या झाडांना पाणी मिळत नसल्याने हे झाडे आत्ता सुकू लागली आहेत.न.प.प्रशासनाने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
खासगी वाहनांना प्रवाशांची पसंती
देवगाव फाटा:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या बस सेवा सुरू केल्या होत्या पण दोन आठवड्यापासून ह्या बस फेऱ्या बंद करण्यात आल्याने अनेक गावातील प्रवाशांना नाईलाजाने खासगी वाहनातून प्रवास करावा लागत आहे.महामंडळाने या भागातील बस चालकांना मुंबईत पाठवून आईला बाजुला सावरुन मावशीला जवळ केल्याचा आरोप सुजान नागरिकांमधून होत आहे.
ऑनलाईन शिक्षणात नेटवर्कचा अडथळा
देवगाव फाटा: सध्या १० वी व १२ वी चे वर्ग सुरू झाले असले तरी इतर वर्गातील अध्यापन पध्दती ही ऑनलाईन सुरू आहे.पण मागील १५ दिवसांपासून बीएसएनएल सह खासगी कंपनीचे नेटवर्क वारंवार गायब होत असल्याने ऑनलाईन शिक्षणात अडथळा निर्माण होत आहे.
मुख्यालयी राहण्याची कर्मचाऱ्यांना ॲलर्जी..
देवगाव फाटा: ग्राम पातळीवर काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक आहे.असा नियम असतांनाही सेलू तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील तलाठी,ग्रामसेवक,कृषी सहाय्यक,आरोग्य कर्मचारी, शिक्षक ही सर्वच कर्मचारी मंडळी मुख्यालयी न राहता शहाच्या ठिकाणाहून येणे - जाणे करीत आहेत.त्यामुळे सहाजिकच हे कर्मचारी त्यांच्या सोईनुसार येत असल्याने सर्वसामान्य जनतेची कामे खोळंबली जातात.