लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन यंत्रणा रुग्णालय प्रशासनाला प्राप्त होवूनही या यंत्रणेतील अडथळे मात्र दूर झाले नाहीत़ तब्बल दोन महिन्यांपासून ही यंत्रणा बसविणारा कंपनीचा अधिकारी परभणीत येत नसल्याने जिल्हाभरातील रुग्ण सिटीस्कॅनच्या सुविधेपासून वंचित आहेत़येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅनची मशीन चार वर्षापूर्वी धर्माबाद येथील रुग्णालयात हलविण्यात आली. तेव्हापासून परभणीतील रुग्णांची हेळसांड होत आहे़ जिल्हा रुग्णालय हे मराठवाड्यातील वैद्यकीय महाविद्यालय नसलेले सर्वात मोठे रुग्णालय आहे़ या रुग्णालयात दररोज साधारणत: १५०० रुग्ण उपचारासाठी दाखल होतात; परंतु, रुग्णालयातील सुविधा मात्र रुग्णांसाठी त्रासदायक ठरू लागल्या आहेत़ गंभीर आजारांच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी सिटी स्कॅन यंत्रणा वापरली जाते़ मात्र कुठलेही कारण नसताना या ठिकाणावरून ही यंत्रणा हलविण्यात आली़ तेव्हापासून परभणीतील रुग्णांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे़ वारंवार पाठपुरावा केल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयासाठी स्वतंत्र सिटीस्कॅन मशीन उपलब्ध झाली़ परंतु, अजूनही परभणीतील रुग्णांची हेळसांड थांबली नाही़ ही यंत्रणा जिल्हा रुग्णालयातील एका कक्षात धूळखात पडून आहे़ सिटीस्कॅन बसविण्यासाठी कंपनीचे अधिकारी फिरकत नसल्याने जिल्ह्यातील रुग्णांना दररोज हजारो रुपयांचा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे़पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याची गरजच्जिल्हा रुग्णालयात चार वर्षांपासून सिटीस्कॅन तपाासण्या बंद आहेत़ त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे़ अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयामध्येच तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी व्यवस्था निर्माण करणे गरजेचे होते़ मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले़च्रुग्णालयातील अत्यावश्यक रुग्णांसाठी करार तत्त्वावर शहरातील खाजगी दवाखान्यांमधून मोफत सिटीस्कॅन तपासणी करण्याची व्यवस्था केली जाते, असे सांगण्यात येते़ मात्र गंभीर आजारांच्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून शहरातील खाजगी रुग्णालयांमध्ये आणणेही धोकादायक ठरू शकते़च्रुग्णालय प्रशासनाने गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी ही सुविधा केली असली तरी प्रत्यक्षात रुग्णांचा खर्च वाचतो़ मात्र जिल्हा रुग्णालय ते खाजगी रुग्णालय अशी होणारी धावपळ या रुग्णांच्या प्रकृतीसाठी धोकादायक ठरू शकते़ त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातच पर्यायी व्यवस्था उभी करून सर्व रुग्णांसाठी सिटी स्कॅनची सुविधा उपलब्ध करून द्यावी, किंवा नवीन मशीन त्वरित सुरू करावी, अशी मागणी होत आहे़एक्स-रे मशीनही बंदच्अस्थिव्यंग रुग्णालयातील एक्स-रे मशीनही किरकोळ दुरुस्तीअभावी बंद आहे़ विशेष म्हणजे, अस्थिव्यंग रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जवळपास प्रत्येक रुग्णाला एक्स-रे मशीनच्या माध्यमातून तपासणी करावी लागते़ मात्र हीच मशीन बंद असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे़ठराविक रुग्णांसाठी सोनोग्राफी मशीनजिल्हा रुग्णालयात असलेली सोनोग्राफी मशीन रुग्णांसाठी कुचकामी ठरत आहे़ ही यंत्रणा चालविण्यासाठी कंत्राटी तत्त्वावर कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे़सर्व रुग्णांची सोनोग्राफी होणे आवश्यक असताना केवळ रुग्णालयात ओपीडीमध्ये भरती असलेल्या रुग्णांचीच सोनोग्राफी केली जात आहे़उपचार घेऊन जाणाºया रुग्णांना सोनोग्राफी तपासणी लिहून दिली जाते़ मात्र ओपीडीत भरती नसेल तर या रुग्णांना सोनोग्राफी होत नसल्याच्या तक्रारी आहेत़
परभणी जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅनला लागेना मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2019 12:10 AM