लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर रविवारी परभणी जिल्ह्यातील १५२ तलाठ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे वितरण करण्यात आले.राज्य शासनाने संगणकीकृत सातबारा देण्याचे धोरण अवलंबिले आहे. यासाठी तलाठी सज्जावरील तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना सातबाराचे वितरण करताना अडचणी उद्भवू नयेत, या उद्देशाने लॅपटॉप आणि प्रिंटर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये तलाठी आणि मंडळ अधिकाºयांना दोन टप्प्यात लॅपटॉप आणि प्रिंटरचे वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी दिले आहेत. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीतून प्राप्त झालेल्या निधीमधून तलाठी व मंडळ अधिकाºयांना लॅपटॉप, प्रिंटरचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लॅपटॉप वितरणाचा पहिला टप्पा रविवारी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरु करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील १५२ तलाठ्यांना पहिल्याच दिवशी लॅपटॉप व प्रिंटरचे वाटप करण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या. या सूचनानुसार जिल्हाभरातील तलाठ्यांना लॅपटॉप, प्रिंटरचे वाटप करण्यात आले.परभणी तहसीलमध्ये कार्यक्रमपरभणी तहसील कार्यालयात रविवारी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या हस्ते तीस तलाठ्यांना लॅपटॉप व प्रिंटर वाटप करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ.सूचिता शिंदे, तहसीलदार विद्याचरण कडावकर, नायब तहसीलदार प्रकाश गायकवाड, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत काजे, शाम सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
परभणी जिल्ह्यात १५२ तलाठ्यांना लॅपटॉपचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:56 AM