शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
"संजय राऊत यांना बैलाएवढीही अक्कल नाही’’, सदाभाऊ खोत यांची टीका
5
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
6
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
7
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
8
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
9
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
10
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
11
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
12
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
13
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
14
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
15
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
16
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
17
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
18
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
19
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
20
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु

फसवणूक टाळण्यासाठी कायदा महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 4:14 AM

परभणी : ग्राहकांच्या फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक न्याय मंचाच्या अध्यक्षा ए.जी. ...

परभणी : ग्राहकांच्या फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक न्याय मंचाच्या अध्यक्षा ए.जी. सातपुते यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने २४ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये सातपुते बोलत होत्या. कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा, अग्रणी बँकेचे अधिकारी एस.आर. हट्टेकर, जिल्हा ग्राहक मंचाचे सदस्य शेख इक्बाल शेख अहमद, किरण मंडोत, अ.भा. ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष विलास मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सातपुते म्हणाल्या, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हा केंद्रीय कायदा असून, ग्राहकांचे फसवणुकीपासून संरक्षण करण्यासाठी तो तयार करण्यात आला आहे. व्यापाराचे जागतिकीकरण आणि व्यापारात ई- कॉमर्स संकल्पनेची अंमलबजावणी करणे हे या नवीन ग्राहक संरक्षण कायद्याचा मुख्य उद्देश आहे. ऑनलाईन खरेदी फसवणुकीच्या तक्रारी दाखल करुन निकाली काढण्यासाठी ई-कॉमर्सची स्थापना करण्यात आली आहे. एखाद्या वस्तूमुळे दुष्परिणाम झाल्यास या नवीन कायद्यात शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ग्राहकांना १ कोटी रुपयांपर्यंत फसवणुकीच्या तक्रारी जिल्हा न्याय आयोगाला, १ ते १० कोटी रुपयांपर्यंतच्या तक्रारी राज्य आयोगाकडे तर १० कोटी रुपयांपुढील तक्रारी राष्ट्रीय आयोगाकडे दाखल करता येतील, असे त्यांनी सांगितले. या वेबिनारमध्ये शेख इकबाल, विलास मोरे यांनीही मार्गदर्शन केले. मंजुषा मुथा यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्राहकांनी सहभाग नोंदविला.