पाथरी - बुधवारी सकाळी तालुक्यातील बोरगव्हाण शिवारात बिबट्याने तीन जनावरांवर हल्ला करून एकास ठार केले होते. तर दोन जनावरांना गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असताना आज सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास सिमुरगव्हाण परिसरात बिबट्याचा मुक्त वावर आढळून आला. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाथरी तालुक्यातील बिबट्याचा वावर वाढल्याचा प्रकार 30 एप्रिल रोजी निदर्शनास आला , रेनाखळी शिवारात डुकरा पासून शेती पिकांना संरक्षण करण्यासाठी लावण्यात आलेल्या जाळीमध्ये बिबट्या अडकून पडला होता यात या बिबट्याचा मृत्यू झाला त्यानंतर अचानक बुधवारी दहा मे रोजी तालुक्यातील बोरगव्हाण शिवारामध्ये सकाळी दहा वाजता बिबट्याने तीन जनावर हल्ला केला यात एका जनावराचा पूर्णतः जवळा पाडला तर एक वासरू या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले तर तिसरे वासराचे कान तुटले गेले.
ही घटना ताजी असतानाच बोरगव्हाण गावाजवळ असणाऱ्या सीमूर गव्हाण गव्हाण परिसरामध्ये आज सायंकाळी शिवाजी गोपीनाथ उगले यां`च्या उसाच्या शेतात गेला. बिबट्या मुक्त फिरताना आढळून आला. बिबट्याचा हा व्हिडिओ शरद उगले या शेतकऱ्याने शूट केला. त्यानंतर ग्रामस्थांनी वन विभागाला याबाबत माहिती दिली. वन विभागाचे अधिकारी अद्याप दाखल झाले नव्हते.