पाथरी (परभणी ) : बांधकाम व्यवसाय सध्या ठप्प असल्याने यावर अवलंबून असलेल्या मजुरांनी काम उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यात पाथरी शहर व ग्रामीण भागातील मजुरांची लक्षणीय संख्या होती.
तालुक्यात पावसा अभावी बहुतांश बांधकामे बंद आहेत.यामुळे यावर अवलंबून असलेल्या मजुरांच्या हाताला काम राहिले नाही. मजुरांवर व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम देण्याची मागणी करत मजुरांनी 3 डिसेंबर रोजी पाथरी तहसीलदारांना एक निवेदन दिले होते. यानंतरही काम उपलब्ध न झाल्याने मजुरांनी आज तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चामध्ये नगरसेवक अलोक चौधरी, वाजेद राज, लाईक राज ,एजाज राज, नसिरुद्दिन राज , खमरूदीन राज ,साजिद राज यांच्यासह तालुक्यातील बांधकाम मजुरांचा सहभाग होता.