जिंतूर तालुक्यातील बामणी हे मोठ्या लोकसंख्येचे गाव आहे. गावात सामाजिक सलोखा राखला जातो. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या गावात देशी दारू दुकानाचा परवाना देण्यात आला आहे. या दुकानाला ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. विशेष म्हणजे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा व देवी मंदिर असल्याने भाविकांची या ठिकाणी वर्दळ असते. त्यामुळे येथे देण्यात आलेला देशी दारू विक्रीचा परवाना तत्काळ रद्द करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी राज्य उत्पादन विभागाचे विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
निवेदनावर ग्रा. पं. सदस्य उज्जवला कदम, अनिता जाधव, सुरेखा मांगूळकर, ज्ञानेश्वर जाधव, वेणूबाई जाधव, सरस्वतीबाई रणखांब, शिवाजीराव देशमुख, विनोद जाधव, अमोल देशमुख, दिलीप जाधव, विनोद वाकळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.