मे महेश कृषी केंद्राच्या विरोधात एका शेतकऱ्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून कृषी केंद्राची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती झालेल्या सुनावणीदरम्यान मे. महेश कृषी केंद्र यांनी बियाणे साठा फलक व भाव फलक ग्राहकास सहज दिसेल अशा ठिकाणी न लावणे, बियाणे साठवणुकीचे गोदाम परवान्यात समाविष्ट न करणे, काही कंपन्यांचे उगम व प्रमाणपत्र परवान्यात समाविष्ट नसताना बियाणे विक्री करणे, सत्यता दर्शक बियाणांच्या स्रोतांची माहिती न देणे, आदी त्रुटी आढळल्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी मे. महेश कृषी केंद्राचा बियाणे विक्रीचा परवाना ४५ दिवसांच्या कालावधीसाठी निलंबित केला आहे. निलंबन काळात महेश कृषी केंद्र यांनी कोणत्याही प्रकारचे बियाणे विक्री करू नये, सध्या प्राप्त बियाणे साठा बियाणे निरीक्षक तथा तालुका कृषी अधिकारी मानवत व बियाणे निरीक्षक कृषी अधिकारी पं. स. मानवत यांच्या देखरेखीखाली रास्त दराने १ जुलैपर्यंत विक्री करून १ जुलै रोजीचा साठा बियाणे उत्पादक व विक्रेते यांना परत करावा, असे आदेशात म्हटले आहे.
मानवत येथील कृषी केंद्राचा बियाणे विक्रीचा परवाना निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:14 AM