अवैध वाळू वाहतूक
परभणी : जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक वाढली आहे. पूर्णा, गंगाखेड आणि पाथरी तालुक्यांतील नदीपात्रातून वाळू उपसा करून बिनदिक्कतपणे काळाबाजार केला जात आहे. प्रशासन मात्र कारवाई करीत नसल्याने माफियांचे फावत आहे.
वसुलीकडे पाठ
परभणी : मार्च महिन्यात सर्व कार्यालये वसुलीसाठी गुंतलेली असतात. महानगरपालिका प्रशासनाने मात्र वसुलीकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची मोठ्या प्रमाणात थकबाकी कायम आहे.
घरकुलांची कामे रखडली
परभणी : पंतप्रधान आवास योजना आणि रमाई आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांच्या लाभार्थ्यांना वेळेत निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे घरकूल बांधकाम पूर्ण करताना लाभार्थ्यांसमोर आर्थिक अडचणी उभ्या राहत आहेत.
पार्किंगचा बोजवारा
परभणी : येथील रेल्वेस्थानक परिसरात पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. स्थानकाचा संपूर्ण परिसर नो पार्किंगमध्ये येत असताना वाहनधारक मिळेल त्या ठिकाणी वाहने लावतात. याविरुद्ध कारवाई होत नसल्याने हा प्रकार बळावला आहे.