परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण कर्ज योजना सुरू केली असून, शेतमाल तारण ठेवल्यास त्यावर कर्ज दिले जाणार असल्याची माहिती सभापती समशेर वरपूडकर यांनी दिली आहे.
या वर्षीच्या खरीप पणन हंगामाला सुरुवात झाली असून, शेतमालाला योग्य भाव मिळावा तसेच शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने स्वनिधीतून दरवर्षी शेतमाल तारण कर्ज योजना राबविली जाते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तारण केलेल्या शेतमालावर प्रचलित दराची एकूण किंमत किंवा शासनाने ठरवून दिलेला हमीभाव या दोन्हीपैकी जो भाव कमी आहे त्यावर ७५ टक्के कर्ज ६ टक्के व्याज दराने १८० दिवसांकरिता दिले जाईल. तेव्हा जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती समशेर वरपूडकर, उपसभापती दिलीपराव अवचार, सचिव संजय तळणीकर यांनी केले आहे.
या शेतमालावर मिळणार कर्ज
या योजनेअंतर्गत तूर, सोयाबीन, मूग, उडीद, चना, हळद, भात, करडई, ज्वारी, बाजरी, गहू, मका या शेतमालावर कर्ज दिले जाणार आहे.