स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परभणी - हिंगोली मतदारसंघात होणार तिरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 06:10 PM2018-05-07T18:10:05+5:302018-05-07T18:10:05+5:30
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात दाखल केलेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीत पात्र ठरले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यातील दोघां अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली, मात्र यावेळी भाजप बंडखोर सुरेश नागरे यांनी अर्ज कायम ठेवला आहे.
परभणी : परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात दाखल केलेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज छाननीत पात्र ठरले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या दिवशी यातील दोघां अपक्षांनी उमेदवारी अर्ज मागे घेतली, मात्र यावेळी भाजप बंडखोर सुरेश नागरे यांनी अर्ज कायम ठेवला आहे. यामुळे ही लढत आता सेना - भाजप व भाजप बंडखोर अशी तिहेरी होईल.
परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांकडून माजी आ़ सुरेश देशमुख, शिवसेना-भाजपा युतीकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया, सुशीलकुमार सुरेशराव देशमुख, भाजपचे सुरेश कुंडलिकराव नागरे आणि डॉ़ प्रफुल्ल श्रीकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले़ होते. या पाचही उमेदवारांची अर्ज छाननीमध्ये वैध ठरले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार असलेले सुशीलकुमार सुरेशराव देशमुख आणि भाजपचे डॉ़ प्रफुल्ल श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामुळे ही लढत आता काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांकडून माजी आ़ सुरेश देशमुख, शिवसेना-भाजपा युतीकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया आणि भाजपचे मात्र अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले सुरेश कुंडलिकराव नागरे यांच्यात होईल.
वेळेत पोहचू शकलो नाही
भाजपचे सुरेश नागरे यांचा अपक्ष अर्ज कायम राहिल्याने या निवडणुकीला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. याबाबत बोलताना नागरे म्हणाले कि, मी वेळेत पोहचू शकलो नाही, यामुळे अर्ज मागे घेता आला नाही. शिवसेना-भाजपा युतीकडून विप्लव गोपीकिशन बाजोरिया हे अधिकृत उमेदवार असताना नागरे यांचीही उमेदवारी कायम राहिल्याने आता निवडणुकीत चुरस वाढली आहे.