शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

पाथरीत महायुती-महाविकास आघाडीत बंडखोरी अटळ; जातिपातीच्या राजकारणाचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 19:00 IST

पाथरी विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार

पाथरी : महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये सरळ लढतीची अपेक्षा असताना गणित बिघडत आहे. आचारसंहिता लागल्यानंतर आणि पक्षाकडून उमेदवारांची नावे जाहीर झाल्यानंतर बंडखोरी अटळ दिसून येत आहे; तर जातिपातीचे राजकारणही आता प्रभावी ठरू लागल्याचे दिसत आहे.

परभणी जिल्ह्यामध्ये पाथरी विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो. या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तगडे नेते आहेत. या नेत्यांचा जिल्हा त्या राजकारणावर वेगळा प्रभाव आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये पाथरी मतदारसंघांमध्ये जरांगे फॅक्टर प्रभावी ठरल्याने महाविकास आघाडीचे संजय जाधव यांना सत्तावीस हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले होते.

विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्थानिक पातळीच्या राजकारणावर येऊन ठेपले आहे. युती आणि आघाडीत उमेदवारीवरून घमासान झाले. महायुतीने आमदार राजेश विटेकर यांच्या आई निर्मलाताई विटेकर यांना उमेदवारी जाहीर केली; तर महाविकास आघाडीने काँग्रेसच्या विद्यमान आमदार सुरेश वरपूडकर यांना फेरसंधी दिली. विटेकरांची उमेदवारी जाहीर होताच शिवसेनेचे सईद खान यांनी बंड पुकारले आहे; तर भाजपाचे माधवराव फडही चाचपणी करत आहेत. वरपूडकर यांना उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे बाबाजानी दुर्राणी यांनी उमेदवारीही भरली. त्यांनी जरांगे-पाटील यांच्याकडूनही उमेदवारीसाठी आंतरवाली सराटीकडे धाव घेतली होती. मात्र फार काही हाती लागले नाही. आतापर्यंत निर्मला गवळी-विटेकर, आमदार राजेश विटेकर आणि माजी आमदार दुर्राणी यांनी उमेदवारी भरली. मात्र अद्याप कोणत्याही उमेदवारीसंदर्भात शक्तिप्रदर्शन झाले नाही.

जिल्ह्यात सर्वाधिक लक्ष या मतदारसंघाकडे लागले असून बंडखोरीमुळे निवडणूक वेगळ्या वळणावर आली आहे. पाथरी मतदारसंघ जिल्ह्यात चर्चेला आला आहे. अंतर्गत बंडाळी टाळण्याचे मोठे आव्हान युती व आघाडीसमोर आहे. मनोज जरांगे यांच्याकडूनही या मतदारसंघांमध्ये उमेदवारी दिली जाणार असल्याने या उमेदवारीचा फटका नेमका कोणाला बसतो किंवा जरांगे फॅक्टर किती प्रभावी राहतो, हे येणारा काळ ठरवणार आहे.

अवधी कमी आणि मतदारसंघ मोठापाथरी मतदारसंघ हा पाथरी, मानवत, सोनपेठ आणि परभणी ग्रामीण असा विस्तारलेला आहे. चारही तालुक्यांत एकत्र प्रभाव असणारा एकही नेता या ठिकाणी दिसून येत नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्यातील नेत्यांची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची ठरणार आहे.

जातिपातीच्या राजकारणावर भरपाथरी मतदारसंघांमध्ये ही निवडणूक लोकसभेप्रमाणे जातिपातीच्या राजकारणावर लढवली जात असल्याचे दिसून येत आहे. कोणत्या जातीचे किती मतदार याचे अंदाज बांधून त्या-त्या जातीच्या नेत्यांना आपल्याजवळ करण्याचे प्रयत्न सर्वांकडूनच केले जात आहेत.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४pathri-acपाथरीmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकparabhaniपरभणी