शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
2
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
3
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : अजित पवारांसह अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क; अनेक ठिकाणी ‘ईव्हीएम’मध्ये बिघाड!
5
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
6
केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
7
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
8
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
9
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
10
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
11
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
12
Vaibhav Suryavanshi: १३ वर्षांच्या मुलाला उघडेल आयपीएलचं दार?
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
14
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
15
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
16
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
17
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
18
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
19
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
20
वाशिम येथे मतदानास सुरुवात; मतदारांना मिळतेय सहकार्य

पैस वाटपाने गाजल्या निवडणुका; दिग्गज नेते निवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 8:08 PM

गंगाखेडमधून शेकाप चारदा तर काँग्रेस, अपक्षांचा तीन वेळा विजय

ठळक मुद्देआर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांमुळे चर्चा वाढलीपैसे वाटपाने गाजली २०१४ ची निवडणूक

परभणी : गेल्या काही वर्षांपासून मतदानासाठी पैसे वाटल्याच्या कारणावरुन सातत्याने राज्यभर गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची चर्चा होत असली तरी या मतदारसंघात एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाने सलग चारवेळा तर काँग्रेसने तीनवेळा विजय मिळविला होता. मुंबईहून खास निवडणुकीसाठी आलेले सीताराम घनदाट यांनीही सलग तीन वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. 

१९६२ पासून २०१४ पर्यंत गंगाखेड विधानसभेची १२ वेळा निवडणूक झाली. त्यामध्ये तीनवेळा काँग्रेसने, चार वेळा शेकापने, तीनवेळा अपक्ष उमेदवाराने, भाजपा आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी एकवेळा निवडणूक जिंकली. १९६२ ते २००४ पर्यत हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव होता. २००९ मध्ये हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी झाला. १९६२ मध्ये काँग्रेसचे देवराव मानदेवराव यांनी रिपब्लिकन पार्टीचे त्र्यंबक मारोती सावंत यांचा ५ हजार ७६९ मतांनी पराभव केला होता. १९६७ मध्ये नामदेवराव मारोतराव यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवून रिपाइंचे डी.एल. मोरे यांचा ८ हजार २९५ मतांनी पराभव केला होता. १९७२ च्या निवडणुकीत काँग्रेसचे त्र्यंबकराव सावंत यांनी आरपीआयचे दौलतराव मोरे यांचा ६ हजार ३६६ मतांनी पराभव केला.

१९७८ मध्ये या मतदारसंघाची गणिते बदलली. यावर्षी शेकापकडून ज्ञानोबा हरि गायकवाड यांनी निवडणूक लढवत आरपीआयचे सटवाजी नांदापूरकर यांचा ३ हजार २९८ मतांनी पराभव केला. पुन्हा १९८० मध्ये शेकापकडून गायकवाड यांनी काँग्रेस आयचे विलास जंगले यांचा ३ हजार २३ मतांनी पराभव केला. १९८५ च्या निवडणुकीत पुन्हा शेकापचे ज्ञानोबा हरि गायकवाड यांनी काँग्रेसचे त्र्यंबकराव सावंत यांचा १९ हजार ६०२ मतांनी पराभव केला. १९९० मध्ये सर्वप्रथम मुंबईतील सर्वप्रथम सीताराम घनदाट यांनी गंगाखेड गाठून भाजपची उमेदवारी मिळविली; परंतु, त्यांचा शेकापचे आ.ज्ञानोबा गायकवाड यांनी तब्बल १२ हजार ८१७ मतांनी पराभव केला. त्यानंतर मात्र १९९५ मध्ये अपक्ष सीताराम घनदाट यांनी शेकापचे ज्ञानोबा गायकवाड यांचा फक्त ४७६ मतांनी  पराभव केला. विशेष म्हणजे त्यावेळी भाजपाचे उमेदवार साळवे यांनी १४ हजार ६६६ तर अपक्ष कांबळे यांनी ५ हजार ४६६ आणि काँग्रेसचे उमेदवार कांबळे यांनी ५ हजार १६६ मते मिळविली होती. मतातील विभाजनामुळे घनदाट यांना या निवडणुकीत विजय मिळविता आला.

१९९९ मध्ये पुन्हा अपक्ष घनदाट यांनी शेकापचे गायकवाड यांचाच ६ हजार ७९६ मतांनी पराभव केला. या निवडणुकीतही गायकवाड यांच्या पराभवाचे कारण मतविभाजनच ठरले. यावेळी भाजपा उमेदवाराने तब्बल १७ हजार ९९०, रिपाइं उमेदवाराने ९ हजार ५०९ तर भारिप बहुजन महासंघाच्या उमेदवाराने २ हजार २२६ मते मिळविली होती. २००४ मात्र भाजपाचे विठ्ठल पुरभाजी गायकवाड यांनी अपक्ष सीताराम घनदाट यांचा ९ हजार ३०१ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर शेकापचे उमेदवार वाव्हळे हे होते. त्यांना २९ हजार ३९५ मते मिळाली. २००९ मध्ये हा मतदारसंघ खुल्या प्रवर्गासाठी सुटला. त्यानंतर पुन्हा अपक्ष उमेदवार घनदाट यांनी भाजपाचे उमेदवार डॉ.मधुसूदन केंद्रे यांचा १८ हजार ८८० मतांनी पराभव केला. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुरेश वरपूडकर हे ४८ हजार ७०३ मते मिळवित तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यावेळी ही निवडणूक चांगली गाजली होती.

आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांमुळे या वर्षी चर्चा वाढलीगंगाखेड विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात यावर्षी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले उमेदवार मोठ्या प्रमाणात उतरत आहेत. त्यामध्ये कंत्राटदार, संस्थाचालक, बँकेचे अध्यक्ष आदींचा समावेश आहे. २०१४ च्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता या निवडणुकीतही मतदारांना मोठ्या प्रमाणात लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते. त्यामुळे निवडणूक विभाग आणि पोलीस यंत्रणेला सतर्क रहावे लागणार आहे. २०१४ च्या निवडणुकीत तत्कालीन जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनी मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात याच मतदारसंघात तळ ठोकला होता. त्यामुळेच अनेक दिग्गजांचे मतदारांना पैसे वाटप करुन मते मिळविण्याचे मनसुबे धुळीस मिळाले होते. आताचे जिल्हाधिकारी पी. शिव शंकर हे या मतदारसंघाच्या अनुषंगाने काय भूमिका घेतात, याबाबत संपूर्ण जिल्हावासीयांचे  लक्ष लागले आहे. 

पैसे वाटपाने गाजली २०१४ ची निवडणूकगंगाखेड विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात २०१४ ची निवडणूक सर्वाधिक गाजली ती  पैसे वाटपाने. या निवडणुकीत पैसे वाटप केल्या प्रकरणी अपक्ष उमेदवार सीताराम घनदाट आणि रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांच्यावर गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवाय निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी पैसेही पकडले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुसूदन केंद्रे यांनी रासपचे उमेदवार रत्नाकर गुट्टे यांचा २ हजार २८९ मतांनी पराभव केला. अपक्ष सीताराम घनदाट हे ४७ हजार ७१४ मते घेत तिसऱ्या क्रमांकावर तर शिवसेनेचे शिवाजी दळणर हे ४१ हजार ९१५ मते घेत चौथ्या आणि मनसेचे बालासाहेब देसाई हे १७ हजार ८१६ मते घेत पाचव्या क्रमांकावर राहिले. 

रासप निवडणुकीच्या रिंगणाबाहेर ?२०१४ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षाकडून रत्नाकर गुट्टे यांनी दुसऱ्या क्रमांकाची ५५ हजार ९३७ मते मिळविली होती. आता शेतकरी कर्ज फसवणूक प्रकरणात ते कारागृहात आहेत. शिवसेना- भाजपाच्या राज्यस्तरीय युतीनुसार गंगाखेडची जागा शिवसेनेकडे गेली आहे. त्यामुळे यावर्षीच्या निवडणुकीत या मतदारसंघातून रासप रिंगणाबाहेर राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019parabhaniपरभणीvidhan sabhaविधानसभा