Maharashtra Assembly Election 2024 : परभणी : जिल्ह्यात सद्यस्थितीत युती व आघाडीचे समान बळ आहे. चार मतदारसंघांपैकी दोन युती तर दोन आघाडीच्या ताब्यात आहेत. मात्र यंदा काय होणार? हा प्रश्न आहे. आघाडी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तर युती वैयक्तिक योजनांवर सभा गाजवत आहे.
परभणीत मागच्यावेळी एकतर्फी विजय मिळविणाऱ्या उद्धवसेनेचे आ. राहुल पाटील यांच्यासमोर शिंदेसेनेचे आव्हान आहे. जिंतूरमध्ये भाजप व राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लढतीत वंचितने रंगत आणली आहे. गंगाखेडात आ. रत्नाकर गुट्टे, विशाल कदम व सीताराम घनदाट पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत. पाथरीत आ.सुरेश वरपूडकर व आ. राजेश विटेकर यांना बंडखोरांनी घेरले आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्देया भागात कृषीप्रक्रिया व इतर उद्योगांचा अभाव असल्याने रोजगाराचा प्रश्न आहे. स्थलांतर सर्वच मतदारसंघात असून यावर कोणीच उपाय न केल्याचा आरोप सत्ताधारी व विरोधकही करीत आहेत.बंडखोरीने तीन मतदारसंघातील उमेदवार जेरीस आले असून यामुळे निकाल बदलण्याची भीती आहे.जरांगे व ओबीसी फॅक्टरमुळे उमेदवार ऑक्सिजनवर असून यावर मात करून विजयाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न आहे.काही मतदारसंघात विकासापेक्षा जातीय गणिते व लक्ष्मीअस्त्र वापराचा कायम जोर राहातो.
जिल्ह्यातील विधानसभांचे चित्र असेमतदारसंघ मतदान विद्यमान आमदार पक्ष मिळालेली मतेजिंतूर ७२.८८% मेघना बोर्डीकर भाजप १,१८,९१३ परभणी ६२.१७% डॉ.राहुल पाटील उद्धवसेना १,०४,५८४गंगाखेड ६८.८७% रत्नाकर गुट्टे रासप ८१,१६९पाथरी ६६.५८% सुरेश वरपूडकर काँग्रेस १,०५,६२५