शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
3
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
4
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
5
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
6
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
7
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
8
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
9
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
10
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
11
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळे विराटचे लाड?
12
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
13
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
14
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
15
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
16
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
17
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
18
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
19
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
20
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ

महाराष्ट्राचा हिवाळ्यात वीज वापराचा विक्रम; एका दिवसांत वापरली २५ हजार ८०८ मेगावॅट वीज

By प्रसाद आर्वीकर | Updated: January 16, 2025 18:50 IST

या दिवशी राज्यभरात २५८०८ मेगा वॅट एवढी वीज मागणी नोंदवली गेली. ती महावितरणने कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता पूर्ण केली आहे

हिंगोली : राज्यात एका दिवसात वापरल्या जाणाऱ्या विजेचा विक्रम मोडला आहे. ११ जानेवारी रोजी राज्यभरातून २५ हजार ८०८ मेगावॅट विजेची मागणी नोंदविण्यात आली, ती महावितरणने अतिरिक्त खरेदी न करता पुरविली. यापूर्वी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी २५४१० मेगावॅट एवढी विक्रमी वीज राज्यभरात वापरली होती.

महावितरण कंपनीच्या वतीने राज्यातील वीजग्राहकांना विजेचा पुरवठा केला जातो. दररोज होणाऱ्या सरासरी मागणीनुसार विजेचे नियोजन करण्यात येते. विशेष म्हणजे, उन्हाळ्यात राज्यात विजेची मागणी वाढते, हिवाळ्यामध्ये मात्र ही मागणी बऱ्यापैकी कमी होते, असा महावितरणचा अनुभव आहे. मात्र ११ जानेवारी रोजी अचानक राज्यात विक्रमी विजेची मागणी नोंद झाली आहे. या दिवशी राज्यभरात २५८०८ मेगा वॅट एवढी वीज मागणी नोंदवली गेली. ती महावितरणने कोणतीही अतिरिक्त वीज खरेदी न करता पूर्ण केली आहे, अशी माहिती महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.

महावितरण दिलेल्या माहितीनुसार महावितरणकडे मुंबईचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यातील वीजपुरवठ्याची जबाबदारी आहे. शनिवारी २५८०८ विजेची मागणी राज्यातून केली. ही मागणी आजपर्यंतची उच्चांकी मागणी ठरली आहे. यापूर्वी ७ फेब्रुवारी २०२४ रोजी २५४१० मेगावॅट तर १४ एप्रिल २०२२ रोजी २५१४४ मेगावॅट विजेची मागणी नोंदवली होती. या मोसमात पाऊस चांगला झाला आहे. कृषी पंपांसाठी विजेची मागणी वाढली असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

...अशी उपलब्ध केली वीजमहावितरण कंपनीने राज्यभरात होत असलेली विजेची मागणी लक्षात घेऊन विविध ठिकाणांहून वीज उपलब्ध केली. त्यामध्ये महानिर्मितीकडून ६९९६ मेगावॅट, केंद्रीय प्रकल्पांकडून ५२५२ मेगावॅट, खाजगी प्रकल्पांकडून ५७३३ मेगावॅट वीज उपलब्ध करण्यात आली. याशिवाय जल विद्युत प्रकल्पातून २००९ मेगावॅट, सौर ऊर्जा प्रकल्पातून ३०९३ मेगावॅट, पवन ऊर्जा प्रकल्पातून २२८ मेगावॅट आणि सहविद्युत निर्मिती प्रकल्पातून २४९८ मेगावॅट वीज उपलब्ध झाली असल्याची माहिती महावितरणने दिली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजparabhaniपरभणी