पालम तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एकूण ३४ पदे मंजूर आहेत. कृषी विभाग अस्तित्वात आल्यापासून एकदाही शंभर टक्के भरलेली नाहीत. अलीकडील दोन वर्षांत पदे भरण्याऐवजी रिक्त होत चालली आहेत. प्रामुख्याने शेतकऱ्यांचा सर्वात जवळचा आणि महत्त्वाचा दुुवा असलेल्या कृषी सहायकांची २५ पैकी १६ पदे रिक्त आहेत. ती दोन वर्षांपासून अनेकवेळा विनंती करूनही भरलेली नाहीत. आजघडीला प्रत्येक कृषी सहायकावर तीन-तीन सज्जांच्या कामकाजाचा बोजा टाकण्यात आलेला आहे. एक सज्जामध्ये किमान चार ते पाच गावांचा समावेश असतो. प्रत्येकाला डझनाहून अधिक गावे सांभाळावी लागतात. हे कर्मचारी कामाच्या ओझ्याखाली दबली आहेत. ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊ शकत नाहीत. तालुक्यावरूनच शेतकरी हिताच्या योजना राबवितात. दुसरीकडे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे पद नेहमी प्रभारी असते. ते यावेळी मात्र भरण्यात आले, परंतु कृषी अधिकाऱ्यांचे तीन पैकी सर्वच पदे रिक्त आहेत. परंतु त्यांच्या बदल्या मंत्रालय स्तरावरून होतात. त्या कृषी सहायकासारख्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय लातूर येथून होत नाहीत. तरीही चार वर्षांपासून पदभरती झाली नसली तरीही पालमला रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही योग्य मार्गदर्शन मिळत नाही. किमान सहसंचालक कार्यालयातून पालम तालुक्यासाठी कृषी सहायक बदलीवर पाठवावेत, अशी अपेक्षा शेतकरी करीत आहेत.
१९ कर्मचाऱ्यांवर चालतो तालुक्याचा कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2021 4:22 AM