शहरातील जुन्या स्टेडियम परिसरात उभारण्यात येत असलेल्या तालुका क्रीडा संकुलाच्या कामाचे भूमिपूजनप्रसंगी आमदार बोर्डीकर बोलत होत्या. यावेळी आमदार बाबाजाणी दुर्राणी, नगराध्यक्ष विनोद बोराडे, उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे, सुरेश नागरे, तहसीलदार बालाजी शेवाळे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रणजित गजमल, मुखाधिकारी नीलेश सुंकेवार, जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, माधव शेजूळ, शैलेंद्र गौतम, डाॅ. संजय हरबडे, यू. डी. इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक सरला गाडेकर, संजय मुंडे आदींची उपस्थिती होती. क्रीडा संकुल उभारणीसाठी नगरपालिकेने ४ एकर जमीन उपलब्ध करून दिल्याने क्रीडा संकुल उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. या संकुलामुळे प्रतिभावंत खेळाडू घडतील. तसेच अंतरराष्ट्रीय पातळीवर नवोदित खेळाडूंना संधी मिळेल, असा विश्वास बोर्डीकर यांनी व्यक्त केला.
पाच कोटींचा आराखडासेलू येथील तालुका क्रीडा संकुलासाठी १ कोटी रुपये प्राप्त असून, क्रीडा समितीकडे ५० लाख रुपये उपलब्ध आहेत. एकूण पाच कोटी निधीचा आराखडा तयार केला आहे. टप्प्या-टप्प्याने कामे पूर्ण केली जाणार आहेत. २०० मीटर ट्रक, खेळाची मैदान, जलतरण तलाव, चार एकर जमीन आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी क्रीडा संकुलाचा फायदा होणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात स्पष्ट केले. तसेच अद्ययावत जलतरण तलाव करण्यासाठी प्रस्ताव सादर करू यासाठी लोकप्रतिनिधी आणि क्रीडा विभागाचे सहकार्य मिळणे आवश्यक आहे, असे बोराडे यांनी नमूद केले. नियोजित क्रीडा संकुलाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. सूत्रसंचालन डी. डी. सोन्नेकर यांनी, तर आभार संजय मुंडे यांनी मानले.