सेनगाव (हिंगोली ) : मराठा समाजाला राज्य शासनाने तातडीने आरक्षण जाहीर करावे, आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावीत या मागणीसाठी सकल मराठा समाजाचे आज शहरात बंद पाळण्यात आला. तसेच रास्तारोको आंदोलनही करण्यात आले. यात काही ठिकाणी आंदोलकांनी दगडफेक केली.
मागील आठ दिवसांपासून शहर व तालुक्यात मराठा आरक्षणसाठी आदोलन सुरु आहेत. आज सकाळी मराठा समाजाला तातडीने आरक्षण दावे व आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावीत या मागणीसाठी शहरात बंद पाळण्यात आला. यावेळी आंदोलकांनी आमदार तानाजी मुटकुळे यांच्या संपर्क कार्यालयावर व एका एटीएम वर दगडफेक केली. तसेच आंदोलकांनी रास्ता रोको करत महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली.