परभणी : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी मंगळवारीही परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात आले़
पालम येथे मराठा समाजबांधवांनी मुंडन करून आंदोलन केले़ तसेच तालुक्यातील कापसी फाट्यावर मंगळवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यामुळे पालम ते गंगाखेड या रस्त्यावरील वाहतूक दोन तास ठप्प पडली होती़ पूर्णा तालुक्यातील महागाव येथील समाजबांधवांनी गोदावरी नदीपात्रात उतरून अर्धजलसमाधी आंदोलन केले़ त्यानंतर तहसील कार्यालयामार्फत कर्मचाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले़ आंदोलनकर्त्यांना बोटीद्वारे गोदापात्राच्या बाहेर काढण्यात आले़ मानवत येथील तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले़.