मानवत तालुक्यातील कोल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पवार व कंत्राटी आरोग्य सहाय्यिका यांचे गैरसंबंध असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांमार्फत करण्यात आल्या होत्या. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या वतीने त्रिसदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. त्यात डॉ. कैलास पवार व आरोग्य सहाय्यिका यांचे गैरसंबंध असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार डॉ. पवार यांना ताकीद देऊन परत असा प्रकार होऊ नये म्हणून जिंतूर तालुक्यातील येलदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. कैलास पवार यांची तात्पुरत्या स्वरूपात बदली करण्यात आली होती. परंतु तरीही डॉ. कैलास पवार यांच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही. डाॅ. पवार यांच्या पत्नीने त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात दिली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेची व सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी डॉ. कैलास पवार यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी निलंबित केले असून, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडे त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत शिफारस केली आहे.
येलदरी येथील वैद्यकीय अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2021 4:16 AM