या बैठकीत २१ दिवसांचा खंड पडूनही रावराजुर आणि पेठशिवणी महसूल मंडळास पीक विम्याच्या अग्रिम रकमेपासून वगळण्यात आल्याबद्दल शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. या दोन्ही महसूल मंडळांचा समावेश विम्याच्या अग्रिम रकमेत करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. शिवाय, पीक नुकसानीच्या पंचनाम्यासोबत खरडणीचेदेखील पंचनामे करावेत, अशी विनंती शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच पूर्वीच्या चाटोरी मंडळातून सहा गावे काढून ती रावराजुर मंडळास जोडली आहेत. ही गावे पूर्ववत चाटोरी मंडळास जोडण्यात यावीत, यासाठी बैठकीत आग्रह करण्यात आला. या बैठकीला खासदार संजय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, तालुका कृषी अधिकारी प्रभाकर बनसावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांच्यासह शेतकरी, रिलायन्स विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 4:20 AM