शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
3
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
4
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
5
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
6
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
7
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
8
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
9
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
10
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
11
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
12
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
13
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
14
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
15
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
16
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
17
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
18
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
19
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
20
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

'...तर मी आत्महत्या केली असती', आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या वक्तव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 5:02 PM

रत्नाकर गुट्टे यांनी रासपच्या तिकीटावर तुरुंगातून विधानसभा निवडणूक लढवली होती.

गंगाखेड: परभणी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघातून निवडूण आलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्या एका वक्तव्याने मतदारसंघात खळबळ उडाली आहे. 'तुम्ही मला निवडून दिलं म्हणून मला जीवदान मिळालं, नाहीतर मी आत्महत्या केली असती', असं विधान रत्नाकर गुट्टे यांनी केलं आहे. पूर्णा येथे नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.  

आमदार गुट्टे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून 2014 ची विधानसभा निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला. यानंतर 2019 च्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. पण, निवडणुकीपूर्वीच त्यांना तुरुंगवास झाला होता. शेतकऱ्यांच्या नावावरील कोट्यवधी रुपये लाटल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यामुळे 2019ची निवडणूक त्यांनी तुरुंगातूनच लढवली होती. अशा परिस्थितीतही त्यांचा विजय झाला.

त्यावेळेस गुट्टे यांची मनःस्थिती काय होती, त्याबाबत त्यांनी कार्यक्रमात बोलून दाखवले. गुट्टे म्हणाले, ‘तुम्ही सर्व मतदार माझे भाऊ-बहीण कुटुंब आहात. तुमच्यामुळेच मला जीवदान मिळालं. खोटं कधी बोलत नाही, पण निवडणुकीत हरलो असतो तर मला आत्महत्या करावी लागली असती. तुम्ही निवडून दिलं म्हणून मी बोनस जगतोय,' असं वक्तव्य आमदार गुट्टे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्याने मतदारसंघात सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

तुरुंगातून विजय खेचून आणलारत्नाकर गुट्टे गंगाखेड शुगरचे चेअरमन, मोठे उद्योजक तथा रासपचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलून फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा जामीन नाकारला होता. यानंतर त्यांनी तुरुंगातूनच गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली. त्यांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशाल कदम यांचा जवळपास 18 हजार मतांनी पराभव केला आहे.

टॅग्स :Parbhani z pपरभणी जिल्हा परिषदgangakhed-acगंगाखेडElectionनिवडणूकMahadev Jankarमहादेव जानकर