चारठाणा : जिंतूर तालुक्यातील चारठाणा गावामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वानरांच्या टोळीला वनविभागाने जेरबंद केले आहे. १ जुलै रोजी गावामध्ये ७१ वानरे पिंजऱ्यात अडकली. ही मोहीम पुढील तीन ते चार दिवस राबविण्यात येणार आहे, तसेच पकडलेले वानरे बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
वानराच्या हल्ल्यात तरुण जखमी
बाेरी : जिंतूर तालुक्यातील बोरी येथे वानराने २ जुलै रोजी गावात धुमाकूळ घातला. यामध्ये अनिल मुंजाजी भिसे (३२) या तरुणावर वानराने हल्ला केला. यामध्ये अनिल भिसे जखमी झाला आहे. पिसाळलेल्या वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
परभणी तालुक्यात आढळले ७ रुग्ण
परभणी : जिल्ह्यात शुक्रवारी आढळलेल्या १४ कोरोना रुग्णांपैकी सर्वाधिक ७ रुग्ण हे परभणी तालुक्यात आढळले आहेत. यासह जिंतूर तालुक्यात ३, गंगाखेड, सेलू व पाथरी तालुक्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे, तर सांगली जिल्ह्यातील एक रुग्ण चाचणीमध्ये आढळून आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.