वसमत रस्त्यावरील कारेगावकर काॅम्प्लेक्समध्ये राष्ट्रमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली, याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गांधी विद्यालयाचे पर्यवेक्षक माणिक आळंदकर, प्रा.शेषेराव नाईकवाडे, शेख असलम यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेख असलम, माणिक आळंदकर व शेषेराव नाईकवाडे यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. प्रसाद ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. रणजित कारेगावकर यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत चौंडीकर यांनी आभार मानले. याप्रसंगी कल्याण अवचार, प्रसन्न भावसार, सय्यद मोबिन, सर्पमित्र अक्षय बिडकर, वेदांत माळवतकर, नितीन जवंजाळ, अंगद जवंजाळ, रोहीत पाटील आदींची उपस्थिती होती.
ऑनलाईन व्याख्यान परभणी : राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त येथील श्री शिवाजी महाविद्यालयात ऑनलाईन व्याख्यान कार्यक्रम पार पडला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या व्याख्यानमालेत प्रा.डाॅ.समाधान इंगळे यांनी मार्गदर्शन केले. वर्तमान काळात समाजाची समतेची घडी बिघडत आहे. अशा परिस्थितीत युवकांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद आणि सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांच्या विचार आणि कार्याचा वारसा घेत समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी कार्य करावे, असे आवाहन डॉ. समाधान इंगळे यांनी यावेळी केले. याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशेट्टी, डॉ. विजया नांदापूरकर, डॉ.रोहिदास नितोंडे, कुलसचिव श्री विजय मोरे यांची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी प्रा. प्रल्हाद भोपे, डॉ.तुकाराम फिसफिसे, डॉ.दिगंबर रोडे, प्रा.सविता कोकाटे, प्रा.राजेसाहेब रेंगे, प्रा.विलास कुऱ्हाडकर आदींनी प्रयत्न केले.