जिंतूर (जि. परभणी) - एका २६ वर्षीय मातेने दोन मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जिंतूर येथे उघडकीस आली़ महानंदा उर्फ नंदा सुदाम कावळे (२६), कन्हैया कावळे (८), अभिजित उर्फ धु्रव कावळे (४) अशी मृतांची नावे आहेत़शनिवारी दुपारी महानंदा या कन्हैया व अभिजित या मुलांसह दळण आणण्यासाठी घराबाहेर पडल्या़ त्या सायंकाळपर्यंत घरी न आल्याने पती सुदाम यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात माहिती दिली़ दरम्यान, परिसरातील महादेव मंदिराशेजारच्या पडीक विहिरीजवळ चपलांचे जोड आढळल्याने पोलिसांनी रात्री विहिरीतील पाणी उपसण्यास सुरुवात केली़ रात्री साडेदहाच्या सुमारास विहिरीत तिघांचे मृतदेह आढळले. कौटुंबिक वादातून महानंदा यांनी हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे.बुलडाण्यात युवा शेतकऱ्याची आत्महत्यासिंदखेड राजा तालुक्यातील (बुलडाणा) जवळच्या राताळी येथील २५ वर्षीय शेतकºयाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. श्रीराम वाघ यांचा मुलगा गजानन शेती करून प्रपंच चालवित होता. मात्र, नापिकी व दुष्काळामुळे त्याच्यावर कर्जाचा डोंगर होता. या विवंचनेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याच्यावर बँक व इतर खासगी असे एकूण ८० हजारांचे कर्ज होते.
परभणीत दोन मुलांसह मातेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 4:08 AM