परभणी : पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने महागाई वाढली असून, हे दर तत्काळ कमी करावेत, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा समाजवादी पार्टीने जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना जगणे मुश्कील झाले आहे. कोरोना काळात शासनाच्या वतीने सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी इंधन दरवाढ करून महागाईच्या झळा दिल्या जात आहेत. पेट्रोलचे दर १०४ रुपये लिटर पेक्षाही अधिक झाले आहेत. त्यापाठोपाठ डिझेल आणि घरगुती गॅसचे दरही वाढले आहेत. तेव्हा ही दरवाढ तत्काळ कमी करावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मन्सूर खान, शमशोद्दीन अन्सारी, मोईन खान, शेख उस्मान, ख्वाजा मुजम्मिल, तसलीम अतिब, रामदास आवचार, युसूफ पटेल, अफसर बेग, फिरोज खान, शेख अजहर, मोसिन खान, शेख रहीम आदींनी दिला आहे.