सोनपेठ (परभणी ) : येथील नाभिक समाजाने सातारा जिल्ह्यातील करपेवाडी येथील भाग्यश्री संतोष माने या अल्पवयीन मुलीच्या हत्येचा निषेध करत आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. यासाठी आज नाभिक समाजाने आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला.
करपेवाडी ( ता. पाटण जि सातारा) येथील नाभिक समाजातील भाग्यश्री उर्फ सोनाली संतोष माने या अल्पवयीन मुलीची धारदार शस्ञाने 22 जानेवारी रोजी गळा कापून हत्या करण्यात आली. यातील आरोपींना गजाआड करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहरातील संत सेना महाराज चौका पासून सकाळी 11 वाजता मुक मोर्चा सुरुवात झाली.टिपू सुलतान चौक, शहिद मुंजाभाऊ तेलभरे चौक, छञपती शिवाजी महाराज चौक मार्गाने हा मोर्चा तहसील कार्यालयात पोहचला. अव्वल कारकून नारायण पिंपळे यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनावर ज्ञानोबा वाघमारे, प्रल्हाद दळवे, अशोक सुरवसे, कारभारी दळवे, बालाजी मस्के, रमेश दळवे, बालाजी सुरवसे, ज्ञानेश्वर दळवे, अर्जुन राऊत, किरण मस्के, भगवान राऊत, दत्ता पारवे, नरहारी सुरवसे, विष्णू मस्के, हरिभाऊ राऊत, पांडूरंग आतखाने, मदन राऊत, बाबा खाडे, सुनिल दळवे, चंद्रकांत गंगोञे, कृष्णा घुले, संतोष मस्के, विलास पंडीत, महादू मस्के, सिताराम आतखाने, दत्ता सुरवसे, राजेश आतखाने, रामप्रसाद दळवे आदींच्या स्वाक्षरी आहेत.
पहा व्हिडिओ :