शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

परभणी जिल्ह्यात आंदोलन : मानवत, पालम, पूर्णेत आंदोलने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:32 AM

मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात मंगळवारीही ठिकठिकाणी आंदोलने झाली. मानवत येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तर पालम तालुक्यात रास्तारोको करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी जिल्ह्यात मंगळवारीही ठिकठिकाणी आंदोलने झाली. मानवत येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. तर पालम तालुक्यात रास्तारोको करण्यात आला.३१ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १२ असे दोन तास मानवत येथे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गजानन बारहाते, नगरसेवक दीपक बारहाते, गोविंद घाटगे, कृष्णा शिंदे, अक्षय कदम, रामप्रसाद काळे, परशूराम कापसे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, अज्ञात समाजकंटकांनी आंदोलनस्थळी विद्युत खांबाची मोडतोड करुन वीज पुरवठा खंडित केला. आंदोलनस्थळी पोलीस सुरक्षा पुरविणे आवश्यक असताना एकही कर्मचारी तहसील कार्यालयात फिरकला नाही, असे आंदोलकांनी सांगितले. शांततेने चालणाऱ्या आंदोलनास गालबोट लावण्यासाठी जाणीवपूर्वक हा प्रकार केला असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष गजानन बारहाते यांनी केला आहे. महसूल व पोलीस प्रशासनाने समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांनी दिले.पालममध्ये रास्तारोकोपालम- मराठा समाजाला आरक्षण द्यावे व खोटे गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी तालुक्यात मंगळवारी आंदोलन करण्यात आले. राज्य रस्त्यावर कापसी फाटा येथे सकाळी ११ वाजता रास्तारोको करण्यात आला. तर शहरातील मुख्य चौकात काही युवकांनी मुंडन करुन शासनाचा निषेध केला. पालम-गंगाखेड राज्य रस्त्यावर केलेल्या आंदोलनामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजुंनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. पालम शहरात मुख्य चौकात सकाळी १० वाजेपासून युवक एकत्र येत होते. या ठिकाणी अनेक युवकांनी मुंडन करुन शासनाचा निषेध नोंदविला. आंदोलन दडपण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ युवकांनी मुंडन केले.एस.टी.वर दगडफेकताडबोरगाव- मानवत तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कोल्हा येथे एस.टी.वर दगडफेक केल्याची घटना ३१ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. एम.एच.२० बीएल ११५० ही बस सेलू वरुन परभणीकडे जात होती. बस कोल्हापाटीच्या पुढे आली असता अज्ञात व्यक्तींनी बसवर दगडफेक करुन बसच्या समोरील व पाठीमागील काचा फोडल्या.महागाव येथे अर्धजलसमाधी आंदोलनताडकळस- सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी ३१ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास महागाव येथे गोदावरी नदीपात्रात उड्या घेऊन अर्धजलसमाधी आंदोलन करण्यात आले. पूर्णा प्रशासनाच्या वतीने १ बोट व रेसक्यू आॅपरेशन पथक या ठिकाणी तैनात केले होते. या पथकाने वेळीच दक्षता घेऊन आंदोलकांना नदीपात्रातून बाहेर काढले.

टॅग्स :parabhaniपरभणीmarathaमराठाreservationआरक्षण