लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : कामगार, कष्टकरी मजूर आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हाभरात मंगळवारी आंदोलने करण्यात आली़ विशेष म्हणजे व्यावसायिक आणि बँक अधिकारी, कर्मचाºयांनीही यात सहभाग नोंदविल्याने मंगळवारचा दिवस आंदोलन वार ठरला़कामगार आणि कष्टकºयांच्या प्रश्नांवर देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे़ ८ आणि ९ जानेवारी असे दोन दिवस पुकारलेल्या या संपाच्या पहिल्याच दिवशी सर्वस्तरातील कामगार, शेतकरी, शेतमजूर सहभागी झाल्याने संपाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर आंदोलकांची गजबज पहावयास मिळाली़सकाळी १० वाजेपासूनच येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात विविध कामगार संघटना आणि कर्मचारी संघटनांनी आंदोलनाला सुरुवात केली़ शासनाच्या धोरणाविरूद्ध रोष व्यक्त करीत आंदोलने करण्यात आली़भारतीय किसान संघकृषी अनुदानाच्या मागणीसाठी भारतीय किसान संघानेही मंगळवारी आंदोलन केले़ शासनाने २५ हजार रुपये प्रती हेक्टरी अनुदान शेतकºयांच्या खात्यात जमा करावे, कृषी निविष्ठांना जीएसटीमधून वगळावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले़ किसान संघाचे जिल्हाध्यक्ष नामदेवराव बुचाले, जिल्हा मंत्री बळवंत कौसडीकर आदींसह नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते़औषधी विक्रेत्यांनी काढला मोर्चाआॅनलाईन औषध विक्रीच्या विरोधात परभणी येथील औषध विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ शहरातील शिवाजी चौक येथून या मोर्चाला प्रारंभ झाला़आॅनलाईन औषध विक्री रुग्णांसाठी हानिकारक असल्याने या औषध विक्रीच्या विरोधात परभणी जिल्हा औषधी विक्रेता संघटनांच्या वतीने हल्लाबोल आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ यावेळी आपले आरोग्य महत्त्वाचे की डिस्काऊंट, आॅनलाईनमुळे पेशंट होतील आॅफलाईन आदी घोषणांचे फलक हातात घेऊन विक्रेते मोर्चात सहभागी झाले होते़ या आंदोलनात परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संजय मंत्री, सचिव सूर्यकांत हाके आदी सहभागी झाले होते़आंदोलनानंतर जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले़ त्यात उच्च न्यायालयाने आॅनलाईन औषध विक्री बंद करावी, असा आदेश दिला आहे़तेव्हा समाजहित जाणून घेत प्रस्तावित अधिसूचनेचा मसुदा रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली़ या आंदोलनात व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़टपाल कर्मचारी संपावरपरभणी- जिल्ह्यातील टपाल कर्मचारी ८ व ९ जानेवारी रोजी संपावर गेल्याने जिल्ह्यातील टपाल व्यवस्था ठप्प झाली आहे़राष्ट्रीय टपाल कर्मचारी संघटना व अ़भा़ टपाल संघटनेच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे़ नवीन पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, डाक सेवकांना कमलेशचंद्र समितीच्या तरतुदी लागू कराव्यात, पाच दिवसांचा आठवडा करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत़पोखर्णी फाट्यावर किसान सभेचा रास्ता रोकोअखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नावर मंगळवारी परभणी-गंगाखेड रस्त्यावरील पोखर्णी फाटा येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात ४५ गावांतील शेतकरी सहभागी झाले होते़ जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही जायकवाडी प्रकल्पातून हक्काचे पाणी सोडले जात नाही़ या धरणात सध्या १२५४ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून, परभणी जिल्ह्याला ५ आवर्तने दिली तर ३८० दलघमी पाणी लागते़ हे पाणी मिळाल्यास दुष्काळात होरपळणाºया जनतेला दिलासा मिळू शकतो़ तेव्हा तत्काळ पाणी पाळी सोडावी, शेतकºयांना हक्काचा पीक विमा अदा करावा, साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे शेतकºयांच्या खात्यावर ऊस बिलाची रक्कम अदा करावी, शेतकरी, शेतमजुरांना प्रती व्यक्ती, प्रती माह धान्य द्यावे, जनावरांच्या दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले़ सकाळी ११ वाजेच्या सुमारास आंदोलनाला प्रारंभ झाला़ किसान सभेचे सरचिटणीस कॉ़ विलास बाबर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनात राजाभाऊ राठोड, अंकुश तवर, माणिक आव्हाड, अनंतराव कच्छवे, रामराव कोळेकर, अशोक कांबळे, राजेभाऊ सूर्यवंशी, बाळासाहेब आव्हाड, पिंटू वाघ, गोपाळ कुलकर्णी, राधाकिशन सूर्यवंशी यांच्यासह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते़ या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.वैद्यकीय प्रतिनिधी४अ़भा़ वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेनेही आंदोलनात सहभाग नोंदविला़ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातून डॉक्टरलेन मार्गे सुमीत जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला़४औषधांवरील जीएसटी रद्द करावी, आॅनलाईन विक्री बंद करा, वैद्यकीय प्रतिनिधींना किमान २० हजार रुपये वेतन द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या़४यावेळी अनिल पांडे, श्रीपाद वैद्य, विशाल भारस्वाडकर, मुदस्सर, पठाण आदींसह वैद्यकीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते़आयटक संघटनेने केले आंदोलन४आयटन प्रणित जिल्ह्यातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मंगळवारी महिला व बालविकास कार्यालयासमोर आंदोलन केले़ कॉ़ माधुरी क्षीरसागर, शेख अब्दुल, सीमा देशमुख, सुनिता धनले, ज्योती कुलकर्णी, मुगाजी बुरुड, संगीता जाधव, लक्ष्मण राठोड, रामराव देशमुख आदींसह बहुसंख्य पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते़१०० कोटींचे व्यवहार ठप्पपरभणी- केंद्र शासनाच्या आर्थिक धोरणाच्या विरोधात सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या एआयबीईए संघटनेचे कर्मचारी देखील दोन दिवसांच्या संपात सहभागी झाले आहेत़ त्यामुळे मंगळवारी जिल्ह्यातील सुमारे १०० कोटी रुपयांचे बँकींग व्यवहार ठप्प पडले होते़ बँक कर्मचाºयांनी मंगळवारी सकाळी बँक आॅफ महाराष्ट्र शाखेसमोर निदर्शने आंदोलन केले़ केंद्र शासनाच्या धोरणाच्या विरोधात तसेच बँक विलिनीकरणाच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले़ यावेळी चंद्रकांत लोखंडे, प्रशांत जोशी यांनी मार्गदर्शन केले़ यावेळी मंगेश टिकुळे, दौलत सरवदे, सुमीत प्रधान, श्याम देशपांडे, मनोज जिंतूरकर, गणेश पारपेल्ली, अविनाश चमवर, सुनिता पाठक, मयुरी खंदारे आदींसह कर्मचारी उपस्थित होते़
परभणीत कर्मचारी, शेतकरी, विक्रेत्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2019 12:34 AM