लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी: पावसाने ताण दिल्यामुळे संपूर्ण जिल्हाभरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून राज्य शासनाने दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध ठिकाणी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.मागील दोन महिन्यांपासून पावसाने ताण दिला आहे. परतीच्या पावसाने पाठ फिरविल्यामुळे रब्बीच्या पेरण्या रखडल्या असून खरिपातील उत्पादनातही मोठी घट झाली आहे. परिणामी शेतकरी आर्थिक कचाट्यात अडकला आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता.परभणीसह मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती आहे. तेव्हा विदर्भ आणि मराठवड्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची सरसगट मदत द्यावी, या प्रमुख मागणीसाठी आंदोलन करण्यात आले. परभणी शहरात वसमत रस्त्यावर हे आंदोलन करण्यात आले. सकाळी १२ वाजेच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाºयांसह तालुक्यातील शेतकरी आंदोलनस्थळी एकत्र आले. शेतकºयांनी सुमारे एक तास रस्ता अडवून आपला रोष व्यक्त केला. जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली. तालुक्यातील अनेक शेतकरी बैलगाडीसह या आंदोलनात सहभागी झाले होते.या आंदोलनामुळे परभणी- वसमत रस्त्यावरील वाहतुक काही वेळ ठप्प झाली होती. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, केशव आरमळ, श्रीराम मोरे, वसंत हारकळ, डिगांबर पवार, अच्युतराव रसाळ, बाळू कोते, बाळासाहेब ढगे, रामेश्वर आवरगंड, अमोल जोंधळे, दादाराव जोंधळे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.मानवतमध्ये महामार्ग अडवला४मानवत- मानवत तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करुन शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, यासह इतर मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलकांनी नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी तालुकाध्यक्ष बाळासाहेब आळणे, सुनील पान्हेरे, हनुमान मसलकर, बाबासाहेब आवचार, अशोकराव बारहाते, मिलिंद निर्वळ, संजय देशमुख, राजेभाऊ मुळे, दत्तराव बारहाते, मुकूंद मगर आदी उपस्थित होते.गंगाखेडमध्ये रास्तारोको४शेतकºयांच्या हक्काच्या मागणीसाठी शनिवारी सकाळी ११ वाजता शहरातील महाराणा प्रताप चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. गंगाखेड तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान शिंदे, तालुकाध्यक्ष चाफळे, महादेव मानगीर, दीनानाथ घिसडी, उत्तम मुलगीर, माधव मानगीर, नागोराव भंडारे, अशोक सरोदे, दत्ता सोळंके, राम लंगोटे, श्रीहरी लंगोटे आदींसह बहुसंख्य शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
परभणीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन: प्रशासनाला दिले निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:32 AM