परभणी : गणपती विसर्जनासाठी शहरात ठिकठिकाणी गणेश मुर्तींचे संकलन करुन या मुर्तींचे विसर्जन एकत्रितरित्या करण्यासाठी मनपाने व्यवस्था केली आहे. यात ३० मुर्ती संकलन केंद्र राहणार असून यात २४ वाहनेही तैनात केली आहेत.
महापालिकेच्या वतीने श्रींच्या विसर्जनासाठी विभाग प्रमुखांची बैठक बुधवारी सायंकाळी ५ वाजता घेण्यात आली. आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी विभागप्रमुखांशी चर्चा केली. यात शहर अभियंता, सहायक आयुक्त, स्थापत्य, विद्यूत अभियंता, भांडारपाल, अग्निशमन विभाग, पाणी पुरवठा विभाग, संकीर्ण विभाग यांना सूचना केल्या. अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील, उपायुक्त मनोज गग्गड, महेश गायकवाड यांची उपस्थिती होती. शहरातील सार्वजनिक व घरगुती मुर्ती संकलन केंद्राजवळ आणून देण्याचे आवाहन आयुक्त तृप्ती सांडभोर, रणजीत पाटील, महेश गायकवाड यांनी केले.सार्वजनिक व घरगुती गणपती विसर्जनाच्या दिवशी मनपाच्या वतीने २४ वाहनांची व्यवस्था केली जाणार आहे.
या ठिकाणी मुर्ती संकलन केंद्र
शारदा महाविद्यालय, सहकार नगर पाटी, गणपती चौक, विसावा कॉर्नर, बाल विद्यामंदिर नानलपेठ, साने चौक, मारुती मंदिर, तेलंग गल्ली, मारुती मंदिर, मल्हार नगर, मारुती मंदिर, गांधी पार्क जवळ, माळी गल्ली हनुमान मंदिर जवळ, मोठा मारुती, म्हाडा कॉर्नर, शांतिनिकेतन कॉलनी, परसावंत नगर डीपी, जिल्हा रेतन केंद्र, दर्गा रोड, गव्हाणे चौक, सिद्धार्थ नगर रोड, माऊली नगर, आशिवाद नगर, दुगी देवी मंदिर, गणपती मंदिर, देशमुख हाँटेल, उघडा महादेव मंदिर, काळी कमान, खानापुर फाटा, शिवशक्ती बिल्डींग अग्रवाल मंगल कार्यालय, लोकमान्य नगर, ज्ञानेश्वर नगर पाटी, खंडोबा बाजार मंदिर जवळ, शिवाजी नगर गणपती मंदिर, विष्णु नगर महादेव मंदिर, रामकृष्ण नगर नवशा मंदिर, जागृती कॉलनी हनुमान मंदिर, खानापूर गाव.