शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

गळ्यावर चाकूने वार करून खून; आरोपीस १० वर्ष सश्रम कारावास

By राजन मगरुळकर | Published: December 16, 2023 5:06 PM

सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासले.

परभणी : नानलपेठ ठाण्यात जानेवारी २०२२ मध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्यातील प्रकरणात जिल्हा न्यायालयातील दुसरे जिल्हा सत्र न्यायाधीश ए.ए.शेख यांनी शनिवारी निकाल दिला. यामध्ये आरोपी शेख मेराज उर्फ मेहराज शेख शकील यास सदोष मनुष्यवधाच्या अपराधासाठी दोषी धरून दहा वर्ष सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

नानलपेठ ठाण्यात २४ जानेवारी २०२२ ला नसरीन बेगम शेख रफीक यांनी फिर्याद दिली. ज्यात नमूद केले, २३ जानेवारी २०२२ रोजी त्यांची बहीण शाहीन बेगम यांनी फोन करुन कळवले, फिर्यादीची मुलगी शरीन बेगम हिला तिचा दीर शेख मेराज उर्फ मेहराज शेख शकील याने पोटावर लाथ मारल्याने तिच्या पोटात दुखत आहे व ती सरकारी दवाखान्यात उपचार घेत आहे, असे कळविले. त्यानंतर फिर्यादी व तिचा पती शेख रफिक शेख गणी व मुलगा शेख यासीन हे दूचाकीवर मुलीचे रिपोर्ट घेऊन सरकारी दवाखान्यात जात असताना आरोपी शेख मेराज उर्फ मेहराज शेख शकील हा समद प्लॉटिंगच्या कॉर्नरजवळ उभा होता. त्याने दुचाकीला लाथ मारल्याने फिर्यादी, पती व मुलगा हे खाली पडले.

यानंतर आरोपी शेख मेहराज याने मै तुमको जिंदा नही छोडूंगा, तुझे खतम करता हु असे म्हणत आरोपीने फिर्यादीच्या पतीच्या गळ्यावर चाकू मारला. यामध्ये फिर्यादीचा पती शेख रफिक जखमी झाले. त्यास उपचारास सरकारी व खासगी दवाखान्यात नेले. अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला. नसरीन बेगम शेख रफीक यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ ठाण्यात कलम ३०७, ३४१ भादविनुसार गुन्हा दाखल झाला. उपचारादरम्यान जखमी मयत झाल्यामुळे गुन्ह्यात कलम ३०२ नुसार वाढ झाली. गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सांगळे यांनी केला. प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार यांचे जवाब नोंदवून घटनास्थळी पंचनामा केला. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र जप्त केले. आरोपीच्या कपड्यावर, शस्त्रावर रक्ताचे डाग आढळले होते. तपासाअंती सपोनि.सांगळे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सहा साक्षीदार तपासले...खटला दुसरे जिल्हा सत्र न्यायाधीश ए.ए.ए.शेख यांच्या न्यायालयात चालला. त्यामध्ये सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासले. वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षीतून शेख रफीक यांचा मृत्यू केवळ हा मनुष्यवध असून जप्त केलेल्या शस्त्रामुळे झाल्याचे निष्पन्न झाले. आरोपीचे जप्त केलेले कपडे व चाकू यावर मयत शेख रफिक यांच्या रक्ताचा अंश आढळला. त्याबद्दल आरोपीने कोणताही खुलासा केला नाही. प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार यांनी न्यायालयासमोर आरोपी शेख मेराज याने चाकूने गळ्यावर वार करून खून केला, असे सांगितले. त्यावरून न्यायालयाने आरोपीस सदोष मनुष्यवधाच्या अपराधासाठी दोषी धरले व आरोपीस कलम ३०४ भाग एक भादविमध्ये दहा वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्याच्या सश्रम कारावास, कलम ३४१ भादविनुसार पाचशे रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.

यांनी मांडली बाजूखटल्यामध्ये मुख्य सरकारी वकील ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक सरकारी वकील नितीन खळीकर यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. पोलीस अधीक्षक रागसुधा.आर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी संतोष सानप, पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण, अंमलदार डि.के.खुणे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी