गंगाखेड: संसदेत नुकतेच पारित झालेल्या नागरिकता संशोधन विधेयक (एनआरसी) सहमत झाले. हे संशोधन संविधानातील तत्वाच्या विरोधात आहे, यामुळे नागरिकांच्या सर्वधर्म समभावाच्या भावनेस हरताळ फासण्यात येत असल्याचा आरोप करत जमियात उलेमा ए हिंद गंगाखेड शाखेच्या वतीने शुक्रवारी दुपारी ३ ते ४ वाजे दरम्यान तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
धरणे आंदोलनानंतर तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन देण्यात आले. आज भारतात वेगवेगळ्या विचारधारेचे नागरिक संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार एकत्रित राहत आहे. भारतीय संसदेत संविधानाच्या विरुद्ध कायदे पारित केल्या जात असल्याने ही बाब अत्यंत गंभीर तसेच अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करून असंवैधानिक आणि अमानवीय असलेला एन आर सी कायदा संविधानाची मुळ रचना नष्ट करण्याच्या उद्देशाने पारित केला असल्याने हा कायदा तात्काळ रद्द करावा अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
आंदोलनात जमियात उलेमा ए हिंदचे गंगाखेड तालुकाध्यक्ष हाफेज अब्दुल खालेक, सचिव मौलाना शेख कलीम, सय्यद याकुब, मुफ्ती जुबेर, मौलाना खमर, शेख इस्माईल, सय्यद चांद, वहाज खान, सय्यद सरदार, हाफेज युसूफ, ॲड. शेख कलीम, सय्यद इस्तियाख, शेख उस्मान, शेरखान, शेख खालेद, सय्यद सलीम, गौस हाश्मी, इरफान कुरेशी, फेरोज खान, शेख वसीम, मुजाहिद खान, शेख रहीम, शाकेर खान, अजहर बागवान, एच एम पठाण, शेख इमाम, शेख अफरोज, मजीद पठाण, सय्यद छोटू, जफर खान, मुस्तफा कुरेशी, सय्यद अजहर, रजाक बागवान, सय्यद इलियास, अब्दुल रहिम, खलील खान पठाण, सय्यद यखीन कादरी, कलीम सौदागर, नजीर पठाण, सय्यद सोहेल, शेख मोसीन आदींचा सहभाग होता.