शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

राष्ट्रीय महामार्ग बनले मृत्यूचे सापळे; खड्डे, साईड पट्ट्यांमुळे वाहनधारक त्रस्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 5:13 PM

जिंतूर-परभणी, जिंतूर-सेनगाव, जिंतूर-जालना, जिंतूर-औंढा-नांदेड हे चारही प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आता मृत्यूचे सापळे बनले आहेत

जिंतूर (परभणी ) : तालुक्यातून जाणारे जिंतूर-परभणी, जिंतूर-सेनगाव, जिंतूर-जालना, जिंतूर-औंढा-नांदेड हे चारही प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आता मृत्यूचे सापळे बनले असून, या रस्त्यांवरून वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे़ यावर प्रशासन, संबंधित यंत्रणा व लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसल्याचे दिसून येत आहे़    

जिंतूर-औंढा हा मार्ग मागील वर्षी खड्डेमुक्त करण्यात आला; परंतु, अवघ्या तीन महिन्यांतच या मार्गावर खड्ड्यांची अवस्था जैसे थे झाली़ लाखो रुपये संबंधित गुत्तेदाराच्या खिशात गेले; परंतु, खड्डे मात्र कायम आहेत़ हीच अवस्था जिंतूर-जालना या रस्त्याची आहे़ लाखो रुपये खर्च झाला़ मात्र ४ फुट रुंद व २ फुट खोल खड्डे एक-दोन नव्हे तर २५ किमीमध्ये १०० पेक्षा अधिक आहेत़ काम करताना सुमार साहित्याचा वापर व अभियंत्यांचे दुर्लक्ष यामुळे या रस्त्याची वाट लागली आहे़ 

जिंतूर-सेनगाव रस्ताही फारसा चांगला नाही़ सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर गेल्या वर्षी लाखोंचा निधी खर्च केला़ गुत्तेदारांचे खिसे भरले़ रस्ता राष्ट्रीय मार्ग म्हणून घोषित झाला. त्यामुळे या रस्ता दुरुस्तीबाबत आता सार्वजनिक बांधकाम विभाग हात वर करीत आहे़ दुरुस्तीवर शासनाने खर्च केलेला पैसा मात्र मातीत गेला आहे़ जिंतूर-परभणी या मार्गाचे खरे हाल  आहेत़ या रस्त्याचे सिमेंट काँक्रेटीकरणाचे काम सुरू आहे़ संबंधित कंत्राटदाराचे कुठलेच नियोजन नसल्याने रस्त्याची वाट लागली आहे़ ठिक ठिकाणी आडवा रस्ता खोदल्याने मोठे गतीरोधक तयार झाले आहेत़ पुलाचे काम करताना कोठेच सुरक्षितता बाळगली नाही़ केवळ झेंडे व पताके लावण्यात आले़ यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे़ विशेष म्हणजे जिंतूर तालुक्यातील कोक ते परभणी तालुक्यातील झरीपर्यंत रस्त्याला वळण रस्ता बनवला़ मुरूम व गिट्टी न वापरता तयार करण्यात आलेला १० किमीचा हा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला आहे़ 

पाऊस पडल्यानंतर वाहनधारकांना गुडघ्या इतक्या चिखलातून मार्गक्रमण करावे लागत आहे़ शिवाय छोट्या वाहनचालकांना  तर कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत़ अपघाताचे प्रमाण वाढले आहे; परंतु, याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे़ परिणामी वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे़ 

सार्वजनिक बांधकाम विभागाने जिंतूर-परभणी, जिंतूर-औंढा, जिंतूर-सेनगाव व जिंतूर-वाटूर हे मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे अद्याप वर्ग केले नाहीत़ त्यामुळे मागील एक वर्षांपासून या रस्त्यावर कोणत्या यंत्रणेने काम करावे, याचा वाद निर्माण झाला आहे़ या सर्व प्रकाराला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार आहे़ त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील महामार्गाच्या खड्ड्यांबाबत पाहणी करून योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणीही होत आहे़ 

६ महिन्यांमध्ये कोट्यवधी पाण्यातमागील वर्षी जिंतूर-औंढा-जिंतूर व जिंतूर-परभणी रस्त्यावर १ कोटी रुपयांपर्यंत खर्च झाला़ तीन वर्षे खड्डे बुजविण्याची जबाबदारी कंत्राटदारांची आहे़ मात्र तीन ते सहा महिन्यांतच  रस्त्याची वाट लागली आहे़ परंतु, अद्यापही एकही कंत्राटदार रस्त्यावर पडलेले खड्डे दुसऱ्यांदा बुजविण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे सहा महिन्यांत खड्डेमुक्तीसाठी खर्च करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा निधी मातीत गेल्याचे दिसत आहे़ 

पुलांची अवस्थाही धोकादायकजिंतूर-जालना, जिंतूर-औंढा, जिंतूर-परभणी या रस्त्यावरील अनेक पुलांना कठडे नसल्याने ते धोकादायक बनले आहेत़ परिणामी अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे़ परंतु, याचे प्रशासन व लोकप्रतिनिधींना सोयरसूतक नसल्याचे दिसून येत आहे़ 

टॅग्स :parabhaniपरभणीhighwayमहामार्गroad safetyरस्ते सुरक्षा