पालम शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात २० जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुपारी २ वाजता पत्रकार परिषद झाली. यावेळी शहर अध्यक्ष इमदाद पठाण, बळीराम चवरे, गंगाधर सिरस्कर आदी उपस्थित होते. पालम तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींचे निवडणूक निकाल लागले असून, ८ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. यानंतर ग्रामीण भागात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी राजकीय पक्ष सरसावले आहेत. २५ ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकल्याचा दावा यावेळी करण्यात आला. यात सायळा, कापसी, धनेवाडी, नाव्हलगाव, केरवाडी, बोरगाव बु., तेलजापूर, वनभूजवाडी, उमरा, आरखेड, फळा, गूळखंड, शेखराजूर, दुटका, सेलू, कोळवाडी, बोरगाव खु., पेठपिंपळगाव, सादलापूर, चोरवड, उक्कडगाव, डोंगरगाव, बनवस, गिरधरवाडी, राजापूर तांडा, बंदरवाडी आदी गावांत राष्ट्रवादी व मित्रपक्ष विजयी झाल्याची माहिती देण्यात आली. १० ते १२ ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य सत्ता स्थापन करताना किंगमेकर ठरणार असल्याचा दावा या पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.
पालम तालुक्यातील २५ ग्रा.पं.वर राष्ट्रवादीचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 4:16 AM