शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

परभणी जि.प.मध्ये राष्ट्रवादीतील फूट टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2018 12:28 AM

जिल्हा परिषदेत काँग्रेस- शिवसेनेच्या सदस्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर काही दिवसांपूर्वी टीका केली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधीलही अंतर्गत वाद सोमवारी चव्हाट्यावर आला. राकाँचे गटनेते अजय चौधरी यांना बदलण्यावरुन या पक्षामध्ये दोन गट पडून निर्माण झालेला वाद तिन्ही आमदारांच्या मध्यस्थीनंतर तुर्त निवळला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : जिल्हा परिषदेत काँग्रेस- शिवसेनेच्या सदस्यांनी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कारभारावर काही दिवसांपूर्वी टीका केली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधीलही अंतर्गत वाद सोमवारी चव्हाट्यावर आला. राकाँचे गटनेते अजय चौधरी यांना बदलण्यावरुन या पक्षामध्ये दोन गट पडून निर्माण झालेला वाद तिन्ही आमदारांच्या मध्यस्थीनंतर तुर्त निवळला आहे.जिल्हा परिषदेत निधी वाटपावरुन शिवसेना व काँग्रेसच्या सदस्यांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे गटनेते राम खराबे, काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास जोगदंड, जि.प.सदस्य बाळासाहेब रेंगे, बाजार समितीचे माजी सभापती गणेश घाटगे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन निधी वाटपात विरोधी पक्षाच्या सदस्यांवर अन्याय झाला असल्याचा आरोप केला होता. काँग्रेस- शिवसेनेसह सत्ताधारी राष्ट्रवादीमधील सदस्यही निधी वाटपावरुन नाराज असल्याचे या सदस्यांनी यावेळी सांगितले होते. या पार्श्वभूमीवर सोमवारी दिवसभर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याची चर्चा होती. जि.प.मध्ये राष्ट्रवादीचे २४ सदस्य आहेत. त्यापैकी नाराज १३ सदस्यांनी वेगळा गट स्थापन करुन जिल्हाधिकाºयांची भेट घेण्याची तयारी केली. या अनुषंगाने स्वतंत्रपणे सभागृहात वेगळा गट स्थापन करता येतो का? याची चाचपणी केली. स्टेशनरोडवरील एका सभापतींच्या निवासस्थानी दुसºया गटातील सदस्यांची जवळपास तीन तास बैठक झाली. या बैठकीस जि.प.सदस्य राजेंद्र लहाने, माजी शिक्षण सभापती दादासाहेब टेंगसे, प्रसाद बुधवंत आदींची उपस्थिती असल्याचे समजले. या बैठकीत राष्ट्रवादीचे गटनेते अजय चौधरी यांच्या कामकाजाविषयी संताप व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादीच्या अन्य सदस्यांना विश्वासात न घेता चौधरी मनमानी पद्धतीने निर्णय घेत आहेत, स्वत:च्या गावासाठी तब्बल साडे पाच कोटी रुपयांचा निधी घेतला अन् इतर सदस्यांवर अन्याय केला गेला, अशीही भावना काहींनी बोलून दाखविली. याबाबतची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे जि.प.तील अन्य पदाधिकारी व सभापती बैठकस्थळी दाखल झाले. त्यानंतर आ.विजय भांबळे, आ.मधुसूदन केंद्रे व जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी नाराज सदस्यांशी फोनवर चर्चा केली. त्यावेळी नाराज सदस्यांनी गटनेते चौधरी यांच्या कामकाजाविषयी आक्षेप नोंदविले. त्यामध्ये चौधरी राकाँच्याच सदस्यांचे ऐकत नाहीत, परस्पर विषय मंजूर करुन घेतात, त्यामुळे इतर सदस्यांवर अन्याय होत आहे. आमची अध्यक्ष, उपाध्यक्ष, इतर कोणत्याही सभापतींविषयी नाराजी नाही. फक्त आमचे म्हणणे मांडण्यासाठी आमचा गटनेता निवडायचा आहे, असे सांगितले. यावर तिन्ही वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीमधील सदस्यांचा अंतर्गत वाद योग्य नाही. यामुळे चुकीचा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाईल. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. गटनेता बदलण्यासंदर्भात दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सर्वसाधारण सभेच्या पूर्व संध्येला नवीन गट स्थापने योग्य होणार नाही, असे सांगितले, असल्याची सुत्रांनी माहिती दिली. शिवाय उपस्थित इतर पदाधिकाºयांनीही नाराज सदस्यांना विश्वासात घेतले जाईल व त्यांची मागणी पूर्ण केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच नाराज सदस्यांच्या निधी वाटपात बदल करुन दिले जातील, असे सांगितले. त्यानंतर नाराज सदस्यांनी दोन ऐवजी चार दिवस घ्या, पण गटनेता बदला व निधी वितणात बदल करुन द्या, अशी मागणी केली व वरिष्ठांच्या शब्दांचा मान राखून माघार घेत असल्याचे सांगितले. त्यानंतर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास ही बैठक संपली. त्यामुळे राष्ट्रवादीतील वाद तुर्तास तरी मिटला आहे. पुढील चार दिवस पक्षाचा गटनेता बदलतो की नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे.आजच्या सर्वसाधारण सभेकडे जिल्ह्याचे लक्षजिल्हा परिषदेची मंगळवारी दुपारी १ वाजता सर्वसाधारण सभा होत आहे. या सर्वसाधारण सभेत विरोधी पक्षांकडून विविध मुद्दे उपस्थित करुन सत्ताधाºयांना खिंडीत गाठण्याची तयारी करण्यात आली असल्याचे समजते. त्यामुळे या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.सर्वसाधारण सभेत प्रसारमाध्यमांना प्रवेश देण्याची मागणीजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधाºयांकडून सातत्याने प्रसारमाध्यमांना प्रवेश न देण्याची भूमिका घेण्यात आली आहे. सभागृहातील अंतर्गत हितसंबंधाच्या आर्थिक बाबींची सभागृहाबाहेर चर्चा होेऊ नये, म्हणून प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सभागृहात नको, अशी भूमिका गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाºयांनी घेतली आहे. त्यामुळे आता विरोधी पक्षाच्या सदस्यांनीच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सभागृहात प्रवेश देण्याची मागणी जि.प.अध्यक्ष व मुख्यकार्यकारी अधिकाºयांकडे केली आहे.४या संदर्भात मंगळवारी काँग्रेसचे गटनेते श्रीनिवास जोगदंड, जि.प.सदस्य बाळासाहेब रेंगे पाटील, शोभाताई रामभाऊ घाटगे यांनी निवेदन दिले आहे. त्यामध्ये पत्रकारांच्या प्रवेशाबरोबरच सर्वसाधारण सभेचे कामकाज इन कॅमेरा करण्याची मागणी केली आहे.शिवसेनेच्या काही सदस्यांची भूमिका मवाळगेल्या आठवड्यात सत्ताधारी राष्ट्रवादीच्या पदाधिकाºयांविरुद्ध आक्रमक भूमिका घेणाºया शिवसेनेच्या काही सदस्यांनी आता मवाळ भूमिका घेतली असल्याचे समजते. यामागचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. मवाळ भूमिका घेणारे सदस्य कोण याचीही चर्चा जि.प.च्या वर्तूळात मंगळवारी दिवसभर होती.