जिंतूर (परभणी ) : नगरपालिकेच्या रिक्त झालेल्या सदस्य पदासाठी निवडणूक झाली होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या परवीन तहजीब जानेमियाँ यांनी विजय संपादन केला. निकालानंतर राकाँ कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
जिंतूर नगरपालिकेच्या वॉर्ड क्र.८ मधील रिक्त झालेल्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून परवीन तहजीब जानेमियाँ तर भाजप पुरस्कृत उमेदवार शाहदा बेगम शेख शफीक, अपक्ष जकिया बेगम अब्दुल मुकील, गंगूबाई विजयराव गवळी हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. १४ डिसेंबर रोजी या पोटनिवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. यात राकाँच्या परवीन तहजीब जानेमियाँ यांना १२५१ मते मिळाली असून, त्यांनी ७६९ मतांनी विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी भाजप पुरस्कृत उमेदवार शाहेदा बेगम शेख शफीक यांना ४५५, जकीया बेगम अ. मुकील यांना ७३, गंगूबाई गवळी (देशमुख) यांना ३३ मते मिळाली. या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते.
पोटनिवडणुकीत आ.विजय भांबळे यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. निवडीनंतर परवीन तहजीब जानेमियाँ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमोद भांबळे, माजी नगराध्यक्ष ्रकपिल फारुकी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे, नगरसेवक मनोहर डोईफोडे, रामराव उबाळे, श्यामराव मते, दलमीर पठाण, शाहेद बेग मिर्झा, प्रदीप चौधरी, अहमद बागवान, बाळू जाधव, दत्ता काळे, शेख इस्माईल, शेख उस्मान खान पठाण आदींची उपस्थिती होती.