पालम शहरासह ग्रामीण भागात गंगाखेड येथून वीजपुरवठा करणाऱ्या विस्ताराने सुमारे ४० वर्ष झाली असून, या विस्तार जीर्ण झाल्याने विजेचा अतिरिक्त भार येतात. त्यातून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याची बाब जानेवारीमध्ये निदर्शनास आली होती. यामुळे शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे का, तसेच जीर्ण वीजतारा बदलून सुरळीत वीजपुरवठ्यासाठी काय कारवाई केली आहे. असा प्रश्न आमदार सुरेश वाडकर यांनी विधानसभेत उपस्थित केला होता. या संदर्भात ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की सदरची वाहिनी चाळीस वर्ष जुनी आहे. परंतु या वाहिनीवरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत नाही. पालम शहरासह ग्रामीण भागात १३२ केव्ही गंगाखेड येथून ते तीस केव्ही वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. या वाहिनीवर एकूण सहा उपकेंद्र आहेत. सदर वाहिनी चाळीस वर्षे जुनी आहे. रब्बी हंगामामध्ये शेती पंपाचा लोड वाढत असल्याने सदर वाहिनीवर ३९० एमपी इतका विद्युत भार येतो. त्यामुळे विद्युतवाहिनी बंद होऊन वीजपुरवठा खंडित होत होता. परंतु डिसेंबर २०२० मध्ये सदर वाहिनीवरील विद्युतभार इतर ते तीस केव्ही वाहिनीवर टाकल्यामुळे सदर वारीचा भार हा ३५० इतका कमी झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत वीजपुरवठा सुरळीत झाला आहे. सदरील वाहिनीवरील विद्युत भारत कायमस्वरूपी कमी करण्यासाठी तातडीने ते तीस केव्ही सारंगी ते पेठ शिवणी या नवीन वाहिनीचे काम प्रगतिपथावर आहे, असे ऊर्जामंत्री राऊत यांनी सांगितले.
सारंगी ते पेठ शिवणी दरम्यान नवीन विद्युत वाहिनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 4:16 AM