पूर्णा तालुक्यातील वझूर येथील रुक्मिणीकांत बाळकृष्ण वझूरकर यांनी वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरण कंपनीकडे अर्ज केला. त्यानंतर, रितसर कोटेशनही दाखल केले. मात्र, महावितरणने वीजपुरवठा जोडून दिला नाही. त्यामुळे वझूरकर यांनी जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे या संदर्भात तक्रार दिली होती. ग्राहक मंचात या प्रकरणी सुनावणी झाली. या सुनावणीत रुक्मिणीकांत वझूरकर यांच्या बाजूने निकाल लागला. महावितरणने वझूरकर यांना तत्काळ वीज जोडणी द्यावी, असा आदेश १५ जून, २०१८ रोजी दिला होता. या आदेशानुसार वझूरकर यांनी वारंवार महावितरणकडे अर्ज करून ग्राहक मंचाच्या आदेशानुसार वीजजोडणी देण्याची मागणी केली. मात्र, आतापर्यंत त्यांना वीजजोडणी देण्यात आली नाही. त्यामुळे आता या प्रश्नी २६ जानेवारी रोजी उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ग्राहक मंचाच्या आदेशानंतरही मिळेना वीजजोडणी - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 4:16 AM