शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पोलीस भरतीतून परभणी जिल्हा वगळला; उमेदवारांना इतर जिल्ह्यामधून करावे लागणार प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2018 7:56 PM

जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस भरती प्रक्रिया होईल, या आशेने मागील अनेक महिन्यांपासून तयारी करणार्‍या युवकांचा सोमवारी हिरमोड झाला आहे.

ठळक मुद्दे पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्ज करुन पोलीस दलात भरती होण्याच्या उद्देशाने हे युवक तयारीला लागले होते. सोमवारी इतर जिल्ह्यांमधून पोलीस भरतीच्या जाहिराती प्रकाशित झाल्या. मात्र  परभणी जिल्ह्यात यावर्षी पोलीस भरती होणार नसल्याची बाब या युवकांच्या निदर्शनास आली.

परभणी : जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस भरती प्रक्रिया होईल, या आशेने मागील अनेक महिन्यांपासून तयारी करणार्‍या युवकांचा सोमवारी हिरमोड झाला आहे. राज्यात सर्वत्र पोलीस भरती होत असली तरी परभणी जिल्ह्यात मात्र ही भरती प्रक्रिया होणार नसल्याने आता या युवकांना पोलीस दलात भरती होण्यासाठी इतर जिल्ह्यांमध्ये प्रयत्न करावा लागणार आहे.

पोलीस कर्मचार्‍यांच्या रिक्त पदासाठी भरती प्रक्रिया होऊ घातली होती. प्रत्येक जिल्ह्यात भरती होणार असल्याने परभणीतील इच्छुक उमेदवारांनीही भरतीची तयारी सुरु केली होती. मागील ६ महिन्यांपासून परभणी शहरासह तालुक्याच्या ठिकाणी युवक-युवती भरतीची तयारी करीत होते. पहाटे आणि सायंकाळच्या वेळी धावणे, लांबउडी, उंचउडी, गोळाफेक आदी क्रीडा प्रकारांचा कसून सराव शहरातील मैदानांवर केला जात होता. पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अर्ज करुन पोलीस दलात भरती होण्याच्या उद्देशाने हे युवक तयारीला लागले होते. सोमवारी इतर जिल्ह्यांमधून पोलीस भरतीच्या जाहिराती प्रकाशित झाल्या.  मात्र  परभणी जिल्ह्यात यावर्षी पोलीस भरती होणार नसल्याची बाब या युवकांच्या निदर्शनास आली. त्यामुळे युवकांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले आहे. ५-६ महिन्यांपासून तयारी केली. मात्र, जिल्ह्यात भरती प्रक्रियाच होणार नसल्याने आता उमेदवारांना इतर जिल्ह्यामधून पोलीस दलातील भरतीसाठी अर्ज करावे लागणार आहेत. 

शासन नियमात अडकली जिल्ह्याची भरती प्रक्रियापरभणी जिल्हा पोलीस दलामध्ये ३१ डिसेंबर २०१७ अखेर पोलीस कर्मचार्‍यांची १ हजार ७९२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३८ पदे रिक्त आहेत. शासनाच्या निर्देशानुसार रिक्त पदांच्या ७५ टक्के पदभरतीची किंवा ३० पदांपेक्षा अधिक पदे असल्यास भरती प्रक्रिया राबवावी, असे निर्देश आहेत. त्यामुळे रिक्त ३८ पदांच्या ७५ टक्के पदे २९ एवढी होत आहेत. ही पदसंख्या ३० पेक्षा कमी असल्याने जिल्ह्यात भरती प्रक्रिया होऊ शकली नाही. त्यामुळे इच्छुक युवकांचा हिरमोड झाला आहे. एकंदर यंदा जिल्ह्यात पोलीस भरती नसल्याने उमेदवारांमधून नाराजी व्यक्त होत आहे. 

इतर जिल्ह्यातून करावे लागणार प्रयत्नपरभणी जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया यावर्षी राबविली जाणार नसली  तरी इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पोलीस कर्मचार्‍यांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पोलीस भरती होणार नाही. त्यात शेजारच्या हिंगोली जिल्ह्याचाही समावेश आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांना इतर जिल्ह्यांमधून पोलीस भरतीसाठी प्रयत्न करावे लागतील. उमेदवारांची संख्या वाढल्याने स्पर्धा अधिक होणार असून स्थानिक उमेदवार नसल्याने जिल्ह्यातील युवकांना नुकसानीलाच सामोरे जावे लागणार आहे. शिवाय परजिल्ह्यात जावून मैदानी चाचण्यांमध्ये पात्र होण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक कौशल्यपणाला लावावे लागणार आहे.

टॅग्स :Policeपोलिसparabhaniपरभणी