कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे दिले जात आहेत. सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर टप्प्याने सहावी वे बारावीचे वर्ग काही दिवस प्रत्यक्ष सुरू झाले होते; परंतु कोरोना संसर्ग पुन्हा वाढल्याने हे वर्गही बंद करण्यात आले आहेत. परिणामी ऑनलाईन शिक्षण हाच एकमेव आधार विद्यार्थ्यांना राहिला. ऑनलाईन शिक्षण घेतल्यानंतर परीक्षेच्या वेळीच कोरोना संसर्ग कायम असल्याने दहावी व बारावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पहिली ते बारावीपर्यंतचे जिल्ह्यातील ३ लाख ९६ हजार ९२९ विद्यार्थी प्रत्यक्ष शाळा न करता व परीक्षा न देताच पास झाले आहेत. आता हे विद्यार्थी पुढच्या वर्गात गेले असले तरी ऑनलाईन शिक्षणाचा त्यांना फारसा फायदा झाला नसल्याचे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. प्रत्यक्ष वर्गातून शिक्षण देणेच योग्य असल्याचेही तज्ज्ञ म्हणतात.
ऑनलाईन शिक्षण....
फायदे
n स्वअध्यापनाची विद्यार्थ्यांना सवय या माध्यमातून लागली.
n सोयीप्रमाणे विविध विषयांचा अभ्यास करणे सोपे झाले आहे.
n विविध तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळवता येते.
n तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांना प्राप्त झाले.
n सुरक्षित ठिकाणी राहून अभ्यास करता येतो.
तोटे
n विषय चांगल्याप्रकारे विद्यार्थ्यांना समजत नाही.
n अभ्यासात एकाग्रता येत नाही.
n विद्यार्थ्यांवर ताण येत असल्याने मानसिक थकवा येतो.
n विद्यार्थ्यांमध्ये आळशी व स्थूलपणा वाढीस
nअभ्यासाबाबत विद्यार्थ्यांना गांभीर्य राहत नाही.
nमूलभूत पाया कच्चाच राहिला.
शहरे
n एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने मोबाईल, इंटरनेटची समस्या
निर्माण झाली.
n ऑनलाईन वर्गांसाठी विद्यार्थ्यांची उपस्थिती असमाधानकारक होती.
n वेळेचे बंधन पाळण्याबाबत विद्यार्थ्यांकडून टोलवाटोलवी
खेडेगाव
n मोबाईल हॅण्डसेट, इंटरनेट नेटवर्कची समस्या प्रकर्षाने जाणवली.
n विजेचा सातत्याने होणारा लपंडाव विद्यार्थ्यांच्या अभ्यासात अडथळा आणणारा ठरला.
n तांत्रिक ज्ञानाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन न मिळाल्याने अभ्यासावर परिणाम