कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने या रुग्णांवर योग्य वेळी उपचार करता यावा, यासाठी आरोग्य विभागाने परभणी शहरात विविध भागांत क्वारंटाईन सेंटर, सीसीटी रुग्णालये सुरू केली होती. त्याचप्रमाणे तालुक्याच्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालयांमध्येही रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र, मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग घटला आहे. सद्य:स्थितीला १३१ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातच आरोग्य विभागाने कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना त्यांच्या घरी उपचार घेण्याची सुविधा दिली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. रविवारी आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालय, अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृह, जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय, तसेच बोरी, पाथरी, मानवत, पूर्णा, पालम आणि सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण उपचार घेत नाही. त्यामुळे शासकीय रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. शिवाय जिंतूर, गंगाखेड, पाथरी, मानवत, पूर्णा, पालम, सोनपेठ या तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. जिल्ह्यात आरटीपीसीआरच्या चाचण्या वाढविण्यात आल्या असल्या तरी त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे जिल्हावासीयांना मागील काही दिवसांपासून दिलासा मिळाला आहे.
सहा रुग्णालयांत एकही कोरोनाचा रुग्ण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:15 AM