लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ई- पॉस मशीनच्या साह्याने धान्याचे वितरण न केल्याच्या कारणावरुन जिल्ह्यातील अडीचशे रेशन दुकानदारांना जिल्हा पुरवठा अधिकाºयांनी नोटिसा बजावल्या आहेत.सप्टेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील रेशन दुकानदारांना ई- पॉस मशीनच्या साह्यानेच धान्य वितरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आॅक्टोबर महिन्याच्या धान्य वितरणाचा अहवाल जिल्हा पुरवठा विभागास प्राप्त झाला असून, जिल्ह्यातील ११८७ रेशन दुकानदारांपैकी २५६ रेशन दुकानदारांनी त्यांना उपलब्ध झालेले सर्व धान्य ई- पॉस मशीनच्या साह्याने वितरित केले नसल्याची बाब उघड झाली. त्यामुळे या २५६ दुकानदारांना दोन दिवसांपूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या असून, खुलासा सादर करण्याचे सूचित केले आहे. ई- पॉस मशीनद्वारे धान्य वितरित झाले नसल्यास अशा दुकानदारांविरुद्ध अनामत रक्कम जप्त करणे, दुकानाचा परवाना निलंबित करणे किंवा रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे पुरवठा विभागातून सांगण्यात आले.परभणी तालुक्यातील ७३, पाथरी २७, जिंतूर ५४, गंगाखेड २०, सेलू १६, पालम १५, पूर्णा १२, सोनपेठ २१ आणि मानवत तालुक्यातील १८ अशा २५६ रेशन दुकानदारांनी ई-पॉस मशीनच्या साह्याने धान्य वितरित न केल्याची अनिमितता आढळून आली असून, या सर्व दुकानदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.
अडीचशे रेशन दुकानदारांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:16 AM