देवगावफाटा (परभणी) : मनमाड येथून धर्माबाद या हायकोर्ट रेल्वेचे बुधवारी औरंगाबादहून धर्माबादसाठी एसी कोच मध्ये सिट नं ४५ आरक्षण एका प्रवाशांने केले. मात्र हा प्रवासी सेलू येथून बसला. त्यामुळे तोपर्यंत त्याची आरक्षित जागा रद्द होऊन ती दुसऱ्या प्रवाशाला देण्यात आली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांने टिसी सोबत वाद घालायला सुरुवात केली. मात्र टिसी सय्यद लियाकत यांंनी संबधीतास रेल्वेचा नविन नियम समजून सांगितल्यानंतर हा वाद मिटला. त्यानंतर हा प्रवाशी इतर कोचमध्ये निघून गेला.
औरंगाबाद येथील एस.त्रिपाठी यांचे बुधवारी औरंगाबाद ते धर्माबाद असे हायकोर्टचे एसी कोच मध्ये सिट नं ४५ हे रिझर्वेशन होते. त्रिपाठी हे बुधवारी काही कामानिमित्त आगोदरच सेलू येथे आले होते. त्यामुळे ते हायकोर्ट रेल्वेत औरंगाबाद येथून न बसता बुधवारी रात्री ८ वाजता सेलू स्थानकावरून हायकोर्टच्या एसी कोच मध्ये चढले. मात्र त्यांच्या आरक्षित जागेवर इतर प्रवाशी बसला होता. त्यामुळे प्रवाशांने टिसी सय्यद लियाकत यांचेशी वाद घालण्यास सुरूवात केली. तेंव्हा ८ दिवसापासून रेल्वेने नवीन तंत्रज्ञान उपकरण सिस्टीम लागू केली आहे. या नियमामुळे आपले आरक्षण हे औरंगाबादहुन होते. आपण त्या ठिकाणी न बसल्याने आपले आरक्षण रद्द झाले. आणि हि जागा दुसऱ्या प्रवाशांना मिळाली. या नविन नियमावलीत स्वतः ची चुक लक्षात आल्याने सदर प्रवाशी इतर कोच मध्ये निघून गेला.
अशी आहे रेल्वेची नविन सिस्टीम...रेल्वे टिसी सय्यद लियाकत यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की,८ दिवसापासून हायकोर्ट, देवगीरी,अजिंठा, नरसापुर या रेल्वेत प्रायोगिक तत्वावर टिसीला एक मोबाईल टँब मशीन (एचएचटी) दिली आहे. ज्या ठिकाणी आरक्षित प्रवाशी बसला की नाही याची अचुक नोंद करायची आहे. हा टँब रेल्वे बुकींग सिस्टीम सर्व्हरला जोडलेला आहे. त्यामुळे आरक्षित जागेवर त्या स्टेशनवर प्रवाशी गैरहजर असेल तर तशी नोंद त्या टँब वर केली जाते. त्यामुळे आरक्षण तातडीने रद्द होऊन पुढील स्टेशन वरील मागणी करणाऱ्या प्रवाशांना किंवा आरएसी प्रवाशांना दिले जावे, असा या नविन तंत्रज्ञानाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसात सर्वच रेल्वेसाठी हि यंत्रणा उपयोग आणली जाणार आहे असे ते म्हणाले.