शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

भरपावसात परभणीत ओबीसींचा एल्गार; जनगणना, स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षणाची मागणी

By राजन मगरुळकर | Published: July 18, 2022 8:03 PM

पाऊस सुरू असताना शहरात सकाळपासून ओबीसी समाजबांधव जिल्ह्यातून तसेच परजिल्ह्यातून दाखल होत होते.

परभणी : स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसींच्या आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी सोमवारी ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. भरपावसात निघालेल्या या मोर्चाने परभणीकरांचे लक्ष वेधून घेतले.

शहरातील शनिवार बाजार येथून दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. नानलपेठ, शिवाजी चौक, स्टेशन रोड येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात मोर्चा दाखल झाला. मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील मार्गदर्शन कार्यक्रमाने झाला. या ठिकाणी मान्यवरांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात भूमिका मांडली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रमुख चार मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. 

पाऊस सुरू असताना शहरात सकाळपासून ओबीसी समाजबांधव जिल्ह्यातून तसेच परजिल्ह्यातून दाखल होत होते. हजारोंचा जनसमुदाय मोर्चामध्ये सहभागी झाला होता. मोर्चातील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विविध वेशभूषेतील कलावंत, वादकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. ओबीसी आरक्षण कायम ठेवावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, ओबीसी आरक्षण लागू होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलाव्यात, मंडळ आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागू कराव्यात, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. निवेदनावर भगवानराव वाघमारे, स्वराजसिंह परिहार, सुरेशराव नागरे, नानासाहेब राऊत, संतोष मुरकुटे, कीर्तीकुमार बुरांडे, किरण सोनटक्के, सुरेश भुमरे, विशाल बुधवंत, रामप्रभू मुंडे, गंगाप्रसाद आनेराव, मोईन मौली, हरिभाऊ शेळके, डॉ. धर्मराज चव्हाण, कृष्णा कटारे, नंदा राठोड, लक्ष्मण बुधवंत, अनंत बनसोडे, अविनाश काळे, साधना राठोड, नंदा बांगर, मनीषा केंद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

विविध संघटनांनी दिला पाठिंबाओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चास शहरासह जिल्ह्यातील विविध पक्ष संघटनांनी पाठिंबा दिला. तसेच या पाठिंब्याचे पत्रही प्रशासनाकडे दिले. या मोर्चातही पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. पोलिसांचा तगडा बंदोबस्तजिल्हा पोलीस दलाने या मोर्चासाठी शहरात फिक्स पॉईंट तैनात करुन वाहतूक व्यवस्थेची कोंडी होऊ नये म्हणून नियोजन केले. शनिवार बाजार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मुख्य बाजारपेठ या सर्वच ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे मोर्चा मार्गावर सुद्धा पोलिसांनी गस्त सुरु ठेवली होती. 

टॅग्स :parabhaniपरभणीOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण